मुंबई | 17 मार्च 2024 : अभिनेत्री आलिया भट्ट कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आलिया बद्दल अनेक अफवा देखील चाहत्यांमध्ये रंगत असतात. रंगणाऱ्या चर्चांवर अभिनेत्री वेळ आल्यानंतर सडेतोड उत्तर देखील देते. ज्यामुळे आलिय चर्चत येते. आता आलिया तिच्या आईमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आलियाची चर्चा रंगली आहे. सध्या आलियाच्या खऱ्या आईची चर्चा रंगत आहे. एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या खऱ्या आईबद्दल आणि पसरणाऱ्या अफवांबद्दल मोठा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत अफवांवर उत्तर देत अभिनेत्रीने रंगणाऱ्य़ा चर्चांना पूर्णविराम दिला आहे..
रिपोर्टनुसार, आलिया भट्ट ही वडील महेश भट्ट आणि बहीण पूजा भट्ट यांची मुलगी असल्याची चर्चा सर्वत्र तुफान रंगलेली असते. पण एका मुलाखतीत आलियाने यामागचं सत्य सांगितलं. आलियाने रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये लावला.
करणने आलिया विचारलं, ‘तुझ्याबद्दल रंगणारी सर्वात वादग्रस्त अफवा कोणाती?’ यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मी महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांची मुलगी आहे…’ तर आलिया भट्ट ही महेश भट्ट यांची दुसरी पत्नी सोनी राजदान यांची मुलगी आहे.
महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, महेश यांनी 1970 मध्ये किरण भट्ट यांच्यासोबत लग्न केलं. महेश – किरण यांच्या मुलाचं नाव राहुल भट्ट आहे. त्यांच्या मुलीचं नाव पूजा भट्ट आहे. दोन मुलांच्या जन्मानंतर महेश – किरण यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महेश यांनी सोनी राजदान यांच्यासोबत लग्न केलं.
महेश भट्ट – सोनी राजदान यांना दोन मुली आहेत. आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट अशी त्यांच्या मुलींची नावे आहेत. आलिया आणि शाहीन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. दोघींना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात येतं. आलिया देखील बहिणीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करत असते.
आलिया तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून आलिया लेक राहा कपूर हिच्यामुळे चर्चेत आहे. आलियाचा पती रणबीर कपूर देखील अनेक मुलाखतींमध्ये राहा हिच्याबद्दल बोलताना दिसतो. राहाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. राहाची एक झलक पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात.