मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. एवढंच नाही तर, अभिनेत्री नुकताच झालेल्या मुलीमुळे देखील चर्चेत असते. आलियाने ६ नोव्हेंबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण अद्याप आलिया आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. पण दोघे कायम राहाबद्दल बोलताना दिसतात. आता देखील आलियाने एक भावुक पोस्ट शेअर करत आई झाल्यानंतर आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. एवढंच नाही तर रात्रभर रडली असं देखील आलियाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. सध्या आलियाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Alia Bhatt photos)
शनिवारी आलियाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. शनिवारी रात्री अभिनेत्री आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन भट्ट यांच्यासोबत होती. शनिवारी रात्री तिघींनी मिळून अभिनेत्री राणी मुखर्जी स्टारर ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ पाहण्याचा निर्णय घेतला. सिनेमा तिघींना फार आवडला.
सिनेमा पाहिल्यानंतर आलिया भावना व्यक्त करत म्हणाली, ‘शनिवारी मी रात्रभर रडत होती. माझी आई आणि बहीण माझ्यासोबत होत्या. आमच्या आवडत्या अभिनेत्रीला पाहिलं. ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ सिनेमाच्या माध्यमातून महत्त्वाची कथा मोठ्या पडद्यावर आली. माझ्यासाठी सिनेमा फार महत्त्वाचा आहे.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी नुकताच आई झाली आहे. त्यामुळे माझ्यासाठी सिनेमा अत्यंत भावुक होता. राणी तुझ्यासारखं कोणी नाही. सिनेमाच्या माध्यामातून तू मला अशा स्थिती दाखवली, जी मी तुझ्यासोबत अनुभवत होती…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ सिनेमा सागरिका चक्रवर्ती यांच्यावर आधारित आहे. नॉर्वे प्रशासनाच्या नियंत्रणातून आपल्या मुलांना मुक्त करण्यासाठी ती एकटीच संघर्ष करते. राणी मुखर्जी हिने मुलांसाठी झटणाऱ्या आईची कथा मोठ्या पडद्यावर मांडली आहे.
राणी मुखर्जी हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. एक काळ असा होता जेव्हा फक्त आणि फक्त राणी मुखर्जी हिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची चर्चा असायची. बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत अभिनेत्रीने काम केलं आहे.
अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) आतापर्यंत अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण सध्या राणी ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. सत्य घटनेवर अधारित सिनेमा असल्यामुळे विश्लेषकांकडून सिनेमाचं कौतुक झालं.