मुंबई : रामायण हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt) ही माता सीतेच्या भूमिकेत आणि अभिनेता रणबीर कपूर हा भगवान राम यांच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दोघांनीही चित्रपट साईन केल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात साऊथ स्टार यश हा देखील मुख्य भूमिकेत असणार असल्याची चर्चा होती. यश हा रावणाच्या भूमिकेत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच आलेल्या रिपोर्टनुसार यश हा रावणाच्या भूमिकेत दिसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यश याने रावणाची नकारात्मक भूमिका करण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे.
यश याने रावणाची भूमिका करण्यास नकार दिल्याने हा एकप्रकारे मोठा झटका चित्रपट निर्मात्यांना असल्याचे सांगितले जात आहे. रामायण चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दिसणार असल्याचे कळल्यापासून त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड असा उत्साह हा बघायला मिळतोय. रामायण हा बहुचर्चित चित्रपट नक्कीच ठरणार आहे.
रामायण चित्रपटात रणबीर कपूर हा दिसणार असल्याचे कळताच कंगना राणावत हिने जाहिर नाराजी व्यक्त केली. इतकेच नाही तर कंगना राणावत हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत रणबीर कपूर याच्यावर थेट टीका देखील केली. या पोस्टमध्ये कंगना राणावत हिने रणबीर कपूर याच्यावर काही गंभीर आरोप देखील लावले.
आता नुकताच आलिया भट्ट ही विमानतळावर स्पाॅट झाली. आलिया भट्ट हिला पाहताच पापाराझी यांनी सीता मॅडम, सीता जी म्हणून आलिया भट्ट हिला आवाज देण्यास सुरूवात केली. सीता जी हे ऐकताच आलिया भट्ट ही लाजताना दिसली. इतकेच नाही तर आलिया भट्ट हिने लगेचच आपल्या चेहऱ्यावर हात लावला. पापाराझी यांच्याकडे पाहून हसताना देखील आलिया दिसली.
पुढे आलिया भट्ट हिने पापाराझी यांना फोटोसाठी काही पोज देखील दिल्या. आता आलिया भट्ट हिचा विमानतळावरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. आलिया भट्ट ही नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. आलिया भट्ट हिने काही दिवसांपूर्वीच कश्मीर येथे आपल्या आगामी चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली. यावेळी आलिया हिच्यासोबत मुलगी राहा ही देखील होती. रामायण या चित्रपटाची शूटिंग यंदाच डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे सांगितले जात आहे.