अभिनेता अल्लू अर्जुन त्याच्या पुष्पा 2 मुळे चर्चेत आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे ते 4 डिसेंबर रोजी त्याच्या चित्रपटाच्या प्रीमिअर दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे. या घटनेमध्ये एका महिलेचा जागीचा मृत्यू झाला तर तिचा मुलगा जखमी झाला होता. हे प्रकरण इतकं तापलं की त्यादरम्यान अल्लू अर्जुनला अटकही करण्यात आली होती. मात्र हे प्रकरण शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत.
प्रीमिअर दरम्यान घडलेल्या घटनेचे पडसाद
दरम्यान मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबाला एक कोटी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या संतप्त वातावरणाचे पडसाद अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला होण्यापर्यंत झाले.
या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या काही लोकांनी आता अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला केला. रविवारी (22 डिसेंबर रोजी) उस्मानिया विद्यापीठातील काही जणांनी अल्लूच्या, हैदराबादमधील जुबली हिल्स परिसरात असलेल्या घरावर हल्ला करून तोडफोड केली.
हल्ल्यानंतर अल्लू अर्जुनने कुटुंबासह घर सोडलं
ही घटना घडली तेव्हा अल्लू अर्जुन त्याच्या घरी उपस्थित नव्हता. पण या घटनेमुळे सर्वांनाच नक्की धक्का बसला. तसेच अल्लू अर्जुनच्या कुटुंबावर पुन्हा असा हल्ला कधाही होऊ होऊ शकतो हे नाकारतही येणार नाही.
Allu Arjun’s kids (Arha & Ayaan) whisked away from the house after attacks today! pic.twitter.com/iu5N5UFZ3Q
— idlebrain.com (@idlebraindotcom) December 22, 2024
या सर्व घटनांचा विचार करता आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता अल्लू आपली पत्नी आणि मुलांसह घर सोडून निघून गेला. या घटनेनंतर त्याच्यासाठी सध्यातरी त्याच्या कुटुबांची सुरक्षा जास्त महत्त्वाची असल्याचं त्याच्या या कृतीवरून नक्कीच लक्षात येत.
अल्लू अर्जुनचे वडील अरविंद यांची प्रतिक्रिया
तसेच या घटनेनंतर अल्लू अर्जुनचे वडील अरविंद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना अल्लू अर्जुनचे वडील अरविंद म्हणाले, “आज आमच्या घरी जे घडलं ते सर्वांनी पाहिलं आहे. कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची ही योग्य वेळ नाही. पोलिसांनी तोडफोड करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माझ्या घराजवळ कोणीही गोंधळ घालू नये, यासाठी पोलीस तैनात आहेत. अशा घटनांना कोणीही प्रोत्साहन देऊ नये. ही संयम ठेवण्याची वेळ आहे. कायदा हे प्रकरण मार्गी लावेल.” असं म्हणत त्यांनी या घटनेचा निषेध केला.
दरम्यान हे प्रकरण काही तोडगा निघून शांत होईल की पुढे अजून याचे पडसाद बघायला मिळतील हे पाहणं महत्त्वाचं आहे.