अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आंदोलकांनी घरात घुसून तोडफोड केली आहे. उस्मानिया विद्यापीठाच्या अनेक सदस्यांनी रविवारी (22 डिसेंबर) अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधील ज्युबली हिल्स येथील निवासस्थानावर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार आंदोलकांनी मालमत्तेचे मोठे नुकसान केले आहे.
साऊथचा सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन त्याचा ‘पुष्पा-2 द रुल’ चित्रपट रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. एकीकडे ब्लॉकबस्टर हिट ठरलेला आणि कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडणारा हा चित्रपट चर्चेचा विषय होता, तर दुसरीकडे या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान घडलेल्या एका अपघाताने हा चित्रपट वादात सापडला होता.
या दोन घटनांमुळे जनताही दोन गटात विभागली गेली. एका बाजूला अल्लू अर्जुनच्या समर्थनार्थ उभे असलेले लोक आहेत तर दुसऱ्या बाजूला अल्लू अर्जुनला विरोध करणारे लोक आहेत.
I appeal to all my fans to express their feelings responsibly, as always and not resort to any kind of abusive language or behavior both online and offline. #TeamAA pic.twitter.com/qIocw4uCfk
— Allu Arjun (@alluarjun) December 22, 2024
गैरवर्तन न करण्याचा सल्ला दिला
अल्लू अर्जुनचे काही खरे चाहते सोशल मीडियावर उघडपणे त्याच्या नावाने पोस्ट करत आहेत, तर दुसरीकडे अनेक लोक अभिनेत्याचे चाहते असल्याचे भासवत लोकांशी गैरवर्तन करत आहेत. याबाबत अल्लू अर्जुनने एक पोस्ट करून सर्वांना स्पष्ट भाषेत सांगितलं आहे.
त्याने म्हटलं आहे की, “मी माझ्या सर्व चाहत्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या भावना जबाबदारीने व्यक्त करा, नेहमीप्रमाणे ऑनलाइन आणि ऑफलाइन कोणत्याही प्रकारची अपमानास्पद भाषा किंवा वर्तन करू नका अन्यथा कारवाई केली जाईल.” अल्लू अर्जुनने आपला चाहता असल्याच्या नावाखाली कायदा हातात न घेण्याबाबत बोलून कडक ताकीद दिली.
अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना स्पष्ट इशारा
अल्लू अर्जुनने त्याच्या ‘डोन्ट इट डू इट’मध्ये लिहिले आहे. या पोस्टवर अल्लू अर्जुनच्या खऱ्या चाहत्यांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे.एकाने लिहिले आहे “आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत. सत्यमेव जयते,” सोशल मीडिया वापरकर्त्याने कमेंट विभागात लिहिले. तर एका व्यक्तीने लिहिले आहे की, “आम्हाला माहित आहे की तुम्हाला तेलुगू सिनेमाचे नाव देशभरात उंच करायचे आहे”
अल्लू अर्जुन का आहे वादात?
पुष्पा-2 च्या स्क्रीनिंग दरम्यान चेंगराचेंगरीत एका चाहत्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. अल्लू अर्जुनसह सिनेमा हॉलचे मालक, व्यवस्थापक आणि सुरक्षा प्रभारीही या प्रकरणात अडकल्याने प्रकरण कोर्टात पोहोचले.
अल्लू अर्जुन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि वेळोवेळी त्याच्या चाहत्यांसाठी संदेश पोस्ट करत असतो. तसेच त्यांने ही पोस्ट करून खोटे चाहते म्हणून गैरवर्तन करणाऱ्यांना थेट इशाराच दिला आहे.