मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : ‘पुष्पा’ सिनेमासाठी अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अभिनेत्या राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अल्लू अर्जुन आणि ‘पुष्पा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाला आजही चाहते विसरु शकलेले नाहीत. राष्ट्रपती पुरस्कारावर स्वतःचं नाव कोरणारा अल्लू अर्जुन पहिला अभिनेता ठरला आहे. 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन विज्ञान भवन, दिल्ली येथे करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अल्लू अर्जुन याला राष्ट्रपती पुरस्कार प्रदान केला. अभिनेत्याला पुरस्कार मिळाल्यामुळे चाहते आणि कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे.
अभिनेत्याला पुरस्कार मिळाल्यामुळे पत्नी अल्लू स्नेहा रेड्डी (Allu Sneha Reddy) हिने भावुक पोस्ट शेअर केली आहे. अल्लू अर्जुन याच्यासोबत काही फोटो पोस्ट करत अभिनेत्याची पत्नी म्हणाली, ‘एक खास दिवस, कधीही न विसरता येणारा क्षण…तुझी कामाशी असलेली बांधिलकी पाहून नेहमीच आनंद होतो..’ सध्या अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. स्नेहा कायम पती आणि मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
अल्लू अर्जन स्टारर ‘पुष्पा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, ‘पुष्पा’ सिनेमाने फक्त बॉक्स ऑफिसवर नाही तर, चहात्यांच्या मनावर देखील राज्य केलं. सिनेमातील डायलॉग सिनेमातील गाणी चहात्यांनी अगदी डोक्यावर उचलून घेतली. लहान मुलं देखील सिनेमातील डायलॉग अभिनेत्याच्या स्टाईल म्हणताना सोशल मीडियावर दिसले. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अल्लू अर्जुन आणि ‘पुष्पा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाला आजही चाहते विसरु शकलेले नाहीत.
अभिनेता अल्लू अर्जुन याच्या ‘पुष्मा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं होतं. सिनेमात अल्लू अर्जुन याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत झळकली होती. संपूर्ण जगभरात सिनेमाने जवळपास 365 कोटी रुपयांच्यावर मजल मारली. आता चाहते ‘पुष्पा २’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. ‘पुष्पा २’ सिनेमा २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.