अल्लू अर्जुन वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्यामुळे महिलाचा मृत्यू! ‘या’ कारणामुळे करणार राजकारणात प्रवेश

| Updated on: Dec 13, 2024 | 1:36 PM

Allu Arjun Arrest: महिलेच्या मृत्यूसाठी अल्लू अर्जुन जबाबदार, अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक, 'या' कारणामुळे करणार राजकारणात प्रवेश... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अल्लू अर्जुन याची चर्चा रंगली आहे.

अल्लू अर्जुन वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्यामुळे महिलाचा मृत्यू! या कारणामुळे करणार राजकारणात प्रवेश
Follow us on

Allu Arjun Arrest: अभिनेता अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा 2’ सिनेमा एकीकडे बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत आहे. तर दुसरीकडे अल्लू अर्जुन याला पोलिसांनी अटक केली आहे. सांगायचं झालं तर, हैदराबादमध्ये 4 डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2’ सिनमाच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याचप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी अभिनेत्याला अटक केली आहे. दरम्यान अभिनेता राजकारणात प्रवेश करणार का? अशा चर्चांनी देखील जोर धरला आहे.

सांगायचं झालं तर, ‘पुष्पा 2’ सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये दिवसागणिक वाढत आहे. अशात अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते देखील गर्दी करतात. याच गर्दीत एका महिलेने स्वतःचे प्राण गमावले आहेत. तर तिच्या मुलाची देखील प्रकृती गंभीर आहे. अशात वाढत्या लोकप्रियतेमुळे अभिनेता राजकारणात प्रवेश करणार का? अशा चर्चा देखील रंगत आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

यावर अल्लू अर्जुन याच्या टीमने स्पष्ट भूमिका मांडली आहे. अभिनेता राजकारणात प्रवेश करणार नाही. रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा आहेत. असं अभिनेत्याच्या टीम कडून सांगण्यात आलं आहे. अल्लू अर्जुन याच्या टीमने एक्सवर एक पोस्ट शेअर करत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

अभिनेत्याच्या टीमने एक्सवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, ‘कृपया असत्य असलेली माहिती पसरवू नका… अशी विनंती आम्ही सर्व पत्रकार आणि वृत्तसंस्थांना करत आहोत. ज्या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही… अशा बातमी पसरवू नका. अचूक आणि योग्य महिती आम्ही अधिकृत अकाउंटवर दिली आहे, माहिती देण्यासाठी याचाच आधार घ्या’

पोस्टमध्ये पुढे लिहिल्या प्रमाणे, ‘अल्लू अर्जुन राजकारणात प्रवेश करणार नाही… हे याठिकाणी आम्ही स्पष्ट करत आहोत. अभिनेता राजकारणात प्रवेश करणार ही बातमी खोटी आणि निराधार आहे. अचूक माहितीसाठी अल्लू अर्जुनच्या अधिकृत टीमच्या विधानाचा आधार घ्यावा.’ सध्या सर्वत्र अल्लू अर्जुन याची चर्चा रंगली आहे.