अल्लू अर्जुनकडे आहेत ‘या’ 5 महागड्या गोष्टी; किंमत ऐकून विश्वास बसणार नाही

| Updated on: Dec 23, 2024 | 3:08 PM

अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाने केलेला धुमाकूळ जगाला माहीत आहे. अल्लू अर्जुनची करोडोंची संपत्ती आहे. पण तुम्हाला माहितीये का की अल्लू अर्जुनकडे अशा कोणत्या महागड्या वस्तूंचा समावेश आहे. या गोष्टींची किंमत ऐकून तुम्हीही नक्कीच थक्क व्हाल.

अल्लू अर्जुनकडे आहेत या 5 महागड्या गोष्टी; किंमत ऐकून विश्वास बसणार नाही
Follow us on

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ हा चित्रपट किती गाजतोय हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. या चित्रपटाने 1000 च्या पुढे कमाई केली आहे. सर्व रेकॉर्ड मोडित काढले आहे. चित्रपटामुळे अल्लू अर्जुन प्रसिद्ध झोतात आला पण त्याहीपेक्षा तो चर्चेत आला ते चित्रपटावेळी घडलेल्या दुर्घटनेमुळे. तसेच त्याच्या तुरुंगात जाण्याने आणि आता त्याच्या घरावर हल्ला झाला या घटनेमुळे सर्वत्र फक्त अल्लू अर्जुनचीच चर्चा आहे.

अल्लू अर्जुन साऊथ इंडस्ट्रीचा ‘परफेक्ट फॅमिली मॅन’ आहे. अल्लू अर्जुनच्या घराबद्दल, त्याच्या कुटुंबाबद्दल, तसेच त्याच्या एकूण संपत्तीबद्दल बऱ्यापैकी माहित आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का अल्लू अर्जुनकडे सर्वात महागड्या गोष्टी कोणत्या आहेत. ज्यांची किंमत वाचून खरंच धक्का बसेल. चला जाणून घेऊयात अल्लू अर्जुनकडे असणाऱ्या त्या सर्वात महागड्या गोष्टी कोणत्या?

संपत्तीतील महागड्या गोष्टी

मीडिया रिपोर्टनुसार 2024 मध्ये अल्लू अर्जुनची संपत्ती 460 कोटी रुपये आहे असं म्हटलं गेलं आहे. अल्लू अर्जुनचा चित्रपट हा हीट ठरतोच पण पुष्पा वन आणि पुष्पा 2 मुळे त्याच्या पर्सनॅलिटीपासून ते त्याच्या कमाईपर्यंत आणि त्याच्या लक्झरी लाईफ पासून त्याच्या संपत्तीपर्यंत सर्वच गोष्टी बदलल्या आहेत. अल्लू अर्जुनकडे अशा 5 गोष्टी आहेत ज्या त्याच्या संपत्तीतील सर्वात महागड्या गोष्टी मानल्या जातात.

त्यातील पहिली गोष्ट म्हणजे अल्लू अर्जुनची आलिशान ‘फाल्कन व्हॅनिटी व्हॅन’ जिची किंमत तब्बल 7 कोटींच्या घरात आहे. त्यानंतर अल्लू अर्जुनकडे ‘जॅग्वॉर एक्सजेएल’ ही आलिशान कार आहे. या कारची किंमत 1.2 कोटी आहे .

सगळ्यात जास्त किंमतीची गोष्ट

अल्लू अर्जुनकडे तशा अनेक महागड्या गाड्या देखील आहेत. यात 75 लाखांच्या ‘हमर एच 3’ गाडीचाही समावेश आहे. तसेच त्याच्याकडे जेट ब्लॅक रेंज रोव्हर ही तब्बल 4 कोटी रुपयांची गाडी देखील आहे. अल्लू अर्जुनकडे असणारी सर्वात यांपैकी सर्वात महागडी गोष्ट म्हणजे त्याचा हैदराबादमधील आलिशान बंगला. या बंगल्याची किंमत जवळपास 100 कोटी रुपये आहे.

दरम्यान अल्लू अर्जुनकडे जरी आज या सर्व महागड्या गोष्टी असल्या तरी त्या गोष्टी त्याने त्याच्या मेहनतीच्या जोरावर कमावलेल्या आहेत. त्यामुळे नेहमीच त्याच्या अभिनयाचं, त्याच्या मेहनतीचं आणि त्याच्या स्वभावाच सर्वजण कौतुक करत असतात.