देश तुझ्या बापाचा आहे का? लोकसभा निवडणुकीनंतर अली गोनीची लक्षवेधी पोस्ट

| Updated on: Jun 05, 2024 | 9:01 AM

Lok Sabha Elections 2024 Results : टीव्ही अभिनेता अली गोनी याने व्यक्त केला संताप, ट्रोल करणाऱ्याला सुनावले खडेबोल.. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहिर केल्यानंतर अभिनेत्याने एक्सवर शेअर केलेली 'ती' पोस्ट चर्चेत... सोशल मीडियावर अभिनेत्याच्या पोस्टची चर्चा...

देश तुझ्या बापाचा आहे का? लोकसभा निवडणुकीनंतर अली गोनीची लक्षवेधी पोस्ट
Follow us on

टीव्ही अभिनेता अली गोनी (Aly Goni) कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अली गोनी याने एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. ज्यामुळे अभिनेता चर्चेत आला आहे. अली याने पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी अभिनेत्याला ट्रोल देखील केलं आहे. अशात अभिनेत्याने देखील ट्रोल करणाऱ्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अली गोनी याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहिर झाल्यानंतर अली गोनी याने ट्विट केलं. अभिनेता म्हणाला, ‘दोघांना 200 चा टप्पा पार केला आहे. यावेळी कांटे की टक्कर असणार आहे. जो कोणी जिंकेल फक्त आमच्या देशाचं भलं होऊ दे.’ अशी पोस्ट अभिनेत्याने केली आहे.

अली याने पोस्ट करताच चाहत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. अनेकांनी अभिनेत्याचं समर्थन केलं, तर अनेकांनी अभिनेत्याला ट्रोल देखील केलं. अली याची पोस्ट वाचल्यानंतर एका नेटकऱ्याने अभिनेत्यासाठी आपत्तीजनक शब्दांचा वापर केला. ज्यावर अभिनेत्याने देखील सडेतोड उत्तर दिलं आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंटला उत्तर देत अभिनेता म्हणाला, ‘देश तुझ्या बापाचा आहे का? आनंदी फक्त तुच होऊ शकतो आहे. फेसलेस भाऊ किंवा बहीण जे कोणी असेल…’, एका एक्समुळे अली तुफान चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर सध्या सर्वत्र अली याची पोस्ट व्हायरल होत आहे.

अली याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता जम्मू – कश्मीर येथील आहे. त्याचा जन्म 25 फेब्रुवारी 1991 रोजी झाला होता. अली याने त्याच्या करियरची सुरुवात ‘एमटीवी स्प्लिट्सविला 5’ शोमध्ये एक स्पर्धक म्हणून केलं. त्यानंतर अली याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2013 मध्ये अली ‘ये है मोहब्बतें’ मालिकेतून घरा-घरात पोहोचला. त्यानंतर अभिनेत्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

‘कुछ तो है तेरे मेरे दरमियान’, बहू हमारी रजनी कांत’, ‘ढाई किलो प्रेम’, आणि ‘नागिन 3’ मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. 2020 मध्ये अभिनेता ‘खतरों को खिलाडी’ शोमध्ये देखील दिसला होता. अली त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो.