बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांच्या आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा त्यांना एकटं राहण्याची किंवा सर्वांपासून काही दिवस नो कनेक्शनमध्ये राहण्याची सवय असते. पण कलाकार हे त्यांच्या शांततेसाठी करतात आणि त्यानंतर पुन्हा आपल्या कामाला नव्या जोमाने सुरुवात करतात.पण काही कलाकारांच्याबाबतीत नो कॉन्टॅक्ट म्हणजे डिप्रेशनचा प्रकार असतो.
अमाल मलिक सध्या डिप्रेशनचा शिकार
सर्वांनाच माहित आहे की डिप्रेशनबद्दल, किंवा मानसिक आरोग्यावर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा या अभिनेत्रींनी अगदी मोकळेपणाने भाष्य केलं आहे. तसेच त्यांच्या आयुष्यात त्यांनी जे अनुभवलं आहे त्याबद्दल सांगितलं आहे. पण योग्य ते उपचार घेत या अभिनेत्री यातून बाहेर पडल्या. आता या अभिनेत्रींनंतर अजून एका बॉलिवूड सेलिब्रिटीने तो डिप्रेशनमध्ये असल्याचं कबूल केलं आहे.
बॉलिवूडचा प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक अमाल मलिक सध्या डिप्रेशनमध्ये आहे. त्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की तो क्लिनिकल डिप्रेशनने ग्रस्त आहे. यासोबतच त्याने असंही लिहिलं आहे की आता तो त्याच्या आयुष्यातील सर्व नात्यांपासून, कुटुंबापासून पूर्णपणे वेगळं होणार आहे, त्याची तशी इच्छा आहे. अमालने केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे आणि चर्चेतही आहे.
Amaal Malik is parting away from his family!! pic.twitter.com/PkVELbLjoT
— Ansh (@Pvt_insaann) March 20, 2025
‘नात्यांमुळे मी तुटलो’, अमाल मलिकची भावनिक पोस्ट
अमालने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत म्हटलं आहे की, तो आता कोणत्याही नात्याचा भाग होऊ इच्छित नाही. त्याने लिहिले आहे की, ‘मी आता कोणाशीही जोडलेलो नाहीये. मी कोणाचाही नाही आणि मला कोणाचंही बनून राहयचं नाहीये. मी थकलो आहे, मी तुटलो आहे, मी आता ते सहन करू शकत नाही’
तसेच त्याने पुढे लिहिले आहे की, ‘मी इतकी वर्षे कठोर परिश्रम करत आहे, पण तरीही मला असं सांगितलं जात आहे कि, दर्शवलं जातं आहे की मी माझ्या प्रियजनांसाठी काहीच चांगले करू शकत नाही. असं म्हणत अमालने त्याच्या मानसिक स्थितीची व्यथा मांडली.
पोस्टवरून यू-टर्न?
पण काही तासांनंतर, त्याने आणखी एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आणि माध्यमांना आवाहन केलं की त्याच्या कुटुंबाला या वादात ओढू नये. अमलने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्या सर्व चाहत्यांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे, परंतु मी माध्यमांना विनंती करतो की त्यांनी माझ्या कुटुंबाला या वादापासून दूर ठेवावं.’ तो पुढे म्हणाला, ‘हे सर्व सांगण्यासाठी मी खूप धाडस केलं आहे, पण हा माझ्यासाठी खूप कठीण काळ आहे. माझे आणि माझा भाऊ अरमान याचे नाते नेहमी तसेच राहील जसे ते होते”
अमालच्या या पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. अमलच्या या वेदनादायक पोस्टने चाहत्यांनी त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.चाहते धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. अमाल मलिकची ही पोस्ट व्हायरल होताच, अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्या समर्थनार्थ संदेश पाठवण्यास सुरुवात केली आहे. लोक त्याला खंबीर राहण्याचा सल्ला देत आहेत आणि सतत त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत.
कोणता दबाव आहे का?
संगीत उद्योगाचा वाढता दबाव, करिअरची अनिश्चितता आणि वैयक्तिक नातेसंबंधांची गुंतागुंत ही या नैराश्याची कारणे आहेत का, असा प्रश्नही उपस्थित केला चाहत्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान अमाल मलिकची ही पोस्ट म्हणजे मानसिक आरोग्य हे आजच्या काळातील सर्वात गंभीर आव्हानांपैकी एक आहे हे दाखवून देत आहे.