प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत 5 वर्ष प्रेमसंबंध, उद्ध्वस्त झाली अमिषा पटेल; म्हणाली, ‘आयुष्यात पुरुषाचं प्रेम…’

| Updated on: Jun 09, 2024 | 9:35 AM

Ameesha Patel Love Life : प्रेम असं असेल तर, नसलेलं बरं..., पाच वर्ष प्रसिद्ध दिग्दर्शकाने अमीषा पटेल हिला केलं डेट, पण नाही केलं लग्न, सर्वकाही उद्ध्वस्त झाल्यानंतर अभिनेत्री म्हणाली, 'आयुष्यात पुरुषाचं प्रेम...', आज अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत 5 वर्ष प्रेमसंबंध, उद्ध्वस्त झाली अमिषा पटेल; म्हणाली, आयुष्यात पुरुषाचं प्रेम...
Ameesha Patel
Follow us on

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल (Ameesha Patel) आज बॉलिवूडपासून दूर असली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली. अमीषा पटेल आता देखील एका अफेअरमुळे चर्चेत आली आहे. बॉलिवूडमध्ये काम करत असताना अमीषा हिच्या आयुष्यात प्रसिद्ध दिग्दर्शकाची एन्ट्री झाला. दिग्दर्शक दुसरे तिसरी कोणी नाही तर विक्रम भट्ट आहेत. पाच वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही…

एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र अमीषा आणि विक्रम भट्ट यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगलेल्या होत्या. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर 2008 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. अभिनेत्रीचं रिलेशनशिप तर संपलंच, पण अमिषा हिचं आयुष्य देखील उद्ध्वस्त झालं.

एका मुलाखतीत खुद्द अभिनेत्री यावर मोठं वक्तव्य केलं होतं. विक्रम भट्ट यांच्यासोबत असलेल्या रिलेशनशिपचा फटका अभिनेत्रीच्या करियरला देखील बसला. अभिनेत्री म्हणाली, ‘इंडस्ट्रीमध्ये प्रामाणिकपणाला कोणतीच जागा नाही. पण मी माझा प्रामाणिकपणा सोडला नाही. मी कधीच माझा स्वार्थ पाहिलं नाही मी कायम भावूक होत निर्णय घेतले…’

‘माझे दोन रिलेशनशिप होते. त्याच कारणामुळे माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट उद्ध्वस्त झाली. याच कारणामुळे 12 – 13 वर्षांपासून माझ्याकडे कोणत्या पुरुषाचं प्रेम नाही… मी आनंदाने जगत आहेत मला आता काहीही नको. चित्रपटसृष्टीत सिंगल राहण्याचा दर्जा कायम ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरते.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली….

रिलेशनशिप अपयशी ठरल्यानंतर अभिनेत्रीने कधीच लग्नाचा विचार केला नाही. वयाच्या 48 व्या वर्षी देखील अमीषा पटेल एकटीच आहे. पैसा, प्रसिद्धी, संपत्ती सर्वकाही असून देखील अभिनेत्री एकटीच आयुष्य जगते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

अमीषा पटेल हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं ‘गदर’ आणि ‘गदर 2’ सिनेमामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. आमीषा हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज अभिनेत्री बॉलिवूडमध्ये दूर असली तर, कायम चर्चेत असते.