मुंबई : ऑस्कर पुरस्कारांमध्ये दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटाच्या ‘नाटू नाटू’ ( Natu Natu Song ) या गाण्याने बाजी मारली आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे १२ मार्च रोजी ऑस्कर पुरस्कार 2023 ( oscar awards 2023 ) वितरण सोहळा पार पडला. चित्रपट रिलीज झाल्यापासूनच हे नाटू नाटू गाणं चर्चेत होतं. त्यानंतर त्याला ऑस्करसाठी नामांकन मिळालं आणि नंतर आता पुरस्कारावरही या गाण्याने नाव कोरलं आहे. देशभरातील सर्वजण या विजयाचा आनंद साजरा करत आहेत. पण या दरम्यान सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये यूएस पोलीसही नातू-नातू गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
एका यूजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे, ज्यामध्ये कॅलिफोर्निया पोलीस ‘नाटू नाटू’ गाण्यावर नाचताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये अनेक लोक रस्त्यावर होळी खेळताना दिसत असून बॅकग्राऊंडमध्ये ‘नाटू नाटू’ हे गाणे वाजत आहे.
सर्वसामान्यांसोबतच दोन पोलीस अधिकारीही या गाण्याच्या हुक स्टेप्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 11 मार्च रोजी शेअर करण्यात आला आहे, ज्यामुळे ऑस्कर पुरस्कारापूर्वीच या गाण्याची जादू जगभर पसरली होती हे स्पष्ट आहे.
#California cops are enjoying the the #NaatuNaatu song.???? Naatu naatu is everywhere #RamCharan #NTR #RRRMovie #SSRajamouli #RRRForOscars #RRR #GlobalStarRamCharan #NTRGoesGlobal #Oscars #Oscars2023 #letsdance pic.twitter.com/rjRQMrjoTs
— nenavath Jagan (@Nenavat_Jagan) March 11, 2023
आरआरआरच्या ऑस्कर विजेत्या सेलिब्रेशनचा व्हिडिओही समोर आला आहे. एका खोलीत, ‘RRR’ सिनेमाची टीम ऑस्कर विजय साजरा करत आहे. व्हिडिओमध्ये एमएम कीरावानी पियानो वाजवताना दिसत आहे आणि प्रत्येकजण त्याच्या तालावर नाचताना दिसत आहे. राम चरण, उपासना कामिनेनी, एसएस राजामौली आणि त्यांच्या पत्नीसह इतर अनेक लोक हजर दिसत आहे.
यावर्षी भारताने एक नाही तर दोन ऑस्कर जिंकले आहेत. RRR च्या Naatu Naatu गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत पुरस्कार मिळाला, तर लघु माहितीपट द एलिफंट व्हिस्पर्सलाही या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.