नवी दिल्ली : सध्या सर्वत्र इस्रायल-हमास युद्धाची चर्चा आहे. 7 ऑक्टोबरला हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलयमध्ये घुसून मानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यानंतर युद्धाला सुरुवात झाली. इस्रायलने आक्रमक भूमिका घेतली. हमासचा समूळ नायनाट करण्याचा संकल्प इस्रायलने सोडलाय. इस्रायलकडून सातत्याने गाझा पट्टीत बॉम्बफेक सुरु आहे. 7 ऑक्टोंबरच्या हिंसाचारात इस्रायलमध्ये 1400 नागरिकांचा मृत्यू झाला. हमासच्या दहशतवाद्यांनी हालहाल, छळ करुन इस्रायली नागरिकांना मारलं. आता इस्रायलकडून गाझा पट्टीत बॉम्बफेक सुरु आहे. हमासच्या तळांना लक्ष्य केलं जातय. यात हमासच्या दहशतवाद्यांबरोबर सर्वसामान्य पॅलेस्टिनी मारले जातायत. आतापर्यंत गाझापट्टीत हजारो पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली सैन्य सध्या गाझा सीमेजवळ आहे. कधीही इस्रायली सैन्य गाझापट्टीत घुसू शकतं. त्यानंतर हे युद्धा आणखी तीव्र होईल.
इस्रायल-हमास युद्धावरुन जगात दोन गट पडले आहेत. अनेक देशात इस्रायलच्या समर्थनात आणि पॅलेस्टाइनच्या समर्थनात प्रदर्शन सुरु आहेत. काहींना इस्रायलची भूमिका चुकीची वाटते, तर काहींना पॅलेस्टिनची. भारतात सुद्धा हिच स्थिती आहे. भारतातही असेच दोन गट आहेत. आता बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने इस्रायल-हमास युद्धावर स्वत:ची भूमिका घेतलीय. कंगना रनौत दिल्ली दौऱ्यावर आहे. तिने तिथे इस्रायली राजदूत नाओर गिलॉन यांची भेट घेतली. इस्रायल-हमास युद्धाबद्दल त्यांच्याशी चर्चा केली.
Had a very soulful meeting with Israel’s ambassador to Bharat Shri Naor Gilon ji.
आज पूरी दुनिया, ख़ासकर इज़राइल और भारत आतंकवाद के ख़िलाफ़ अपनी जंग लड़ रहे हैं । कल जब मैं रावण दहन करने दिल्ली पहुँची, तो मुझे लगा कि इज़रायल एम्बेसी आकर उन लोगो से मिलना चाहिए जो आज के आधुनिक… pic.twitter.com/syCkDxJCze— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 25, 2023
काय म्हणाली ही अभिनेत्री?
“इस्रायल आणि भारत दहशतवादाविरोधात युद्ध लढतायत. काल मी रावण दहनासाठी दिल्लीत आली होती, त्यावेळी मला वाटलं की, इस्रायली एम्बेसीमध्ये येऊन त्या लोकांना भेटलं पाहिजे, जे हमास सारख्या आधुनिक रावणाबरोबर लढतातय. त्यांना पराभूत करतायत. ज्या प्रकारे लहान मुलं, महिलांना टार्गेट केलं जातय ते हादरवून सोडणार आहे. दहशतवाद विरोधी युद्धात इस्रायल विजयी होणार, याची मला पूर्ण खात्री आहे. त्यांच्यासोबत मी माझा आगामी चित्रपट तेजसबद्दल चर्चा केली” असं कंगना रनौतने तिच्या X वरील पोस्टमध्ये म्हटलय.