एक काळ असा देखील होता जेव्हा महानायक अमिताभ बच्चन फक्त त्यांच्या सिनेमांमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आले होते. अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या नात्याबद्दल आज प्रत्येकाला माहिती आहे. पण अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री अर्चना पूरन सिंग यांच्या नात्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. वयाच्या 61 व्या वर्षी देखील अर्चना झगमगत्या विश्वात सक्रिय आहे. तिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अर्चना तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात आनंदी आहे. पण एक काळ असा होता जेव्हा अर्चना आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या…
1990 मध्ये अमिताभ बच्चन आणि अर्चना पूरन सिंग यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघांचे काही फोटो देखील इंटरनेटवर व्हायरल झाले होते. एका मॅगझीनमध्ये अमिताभ बच्चन आणि अर्चना पूरन सिंग यांचा एक फोटो आला होता. फोटोमध्ये अमिताभ बच्चन आणि अर्चना पूरन सिंग रोमाँटिक पोज देताना दिसले होते.
मॅगझीनमधील अमिताभ बच्चन आणि अर्चना पूरन सिंग यांचा फोटो सर्वांपर्यंत पोहोचल्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. अनेकांनी अमिताभ बच्चन यांनी सत्य देखील विचारलं. पण बिग बी यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही…
सर्वत्र अमिताभ बच्चन आणि अर्चना पूरन सिंग यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्यानंतर मॅगझीनने एप्रिल फूलच्या दिवसांमध्ये एक प्रँक केल्याचं समोर आलं. या गोष्टीची कल्पना अमिताभ बच्चन यांना होती. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोटोमध्ये अर्चना हिच्यासोबत दिसणारे बिग बी नव्हते तर, अमिताभ बच्चन यांचे डुप्लिकेट होते. पण तेव्हा दोघांच्या नात्याची चर्चा तुफान रंगली होती.
सांगायचं झालं तर, आज अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील चाहते त्यांना शुभेच्छा देत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांची चर्चा रंगली आहे.