मल्टी स्टारर ‘बागबान’ सिनेमातील राहुल तुम्हाला सर्वांना आठवत असेलच. सिनेमात राहुल म्हणून भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराने सर्वांच्या मनावर राज्य केलं. आता तोच राहुल मोठा झाला आहे आणि स्वतःच्या अटींवर आयुष्य जगत आहे. त्याचं नाव यश पाठक असं आहे. यश आता संगीत विश्वात स्वतःचं करिअर करत आहे. सोशल मीडियावर देखील यश याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. यश याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. यश याला आता पहिल्यानंतर तो खरंच लहानपणीचा राहुल आहे का? यावर तुमचा विश्वास देखील बसणार नाही.
‘बागबान’ सिनेमात यश याने महानायक अमिताभ बच्चन यांच्या नातवाची भूमिका साकारली होती. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बागबान’ सिनेमात अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, सलमान खान, समीर सोनी, महिमा चौधरी, दिव्या दत्ता, रिमी सेन यांसारखे अनेक सेलिब्रिटी होती. यश याने सिनेमात बालकलाकारची भूमिका साकारली होती.
सिनेमात राहुलची भूमिका साकारणारा हा मुलगा आता मोठा झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याचा लुकही इतका बदलला आहे की, त्याला बघून तुम्हाला कदाचित ओळखता येणार नाही. सिनेमाला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. रिपोर्टनुसार, 2003 मध्ये सिनेमाने 12 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर जगभरात सिनेमाने 43 कोटींचा गल्ला ओलांडला होता.
यश पाठक याच्याबद्दल सांगायचं झालं तर, यश याने ‘बागबान’ सिनेमाशिवाय अलावा ‘गंगाजल’, ‘राहुल’, ‘परवाना’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण त्याने आता सिनेमामधून ब्रेक घेतला आहे. अभिनयाला राम राम ठोकल्यानंतर यश याने म्यूझिक विश्वात स्वतःचं करियर केलं आहे.
यश संगीतकार आणि संगीत निर्माता आहे. यश सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी संपर्कात राहाच असतो. अनेकदा त्याच्या गाण्यांचे अपडेट्स देखील सोशल मीडियावर शेअर करतो. यश याने एआर रहमानसोबत कोक स्टुडिओमध्येही काम केले आहे. यशचे स्वतःचे YouTube चॅनल देखील आहे जिथे तो स्वतःचे संगीत व्हिडिओ शेअर करतो.