मुंबई : अमिताभ बच्चन यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांचा काही दिवसांपूर्वीच उंचाई हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने मोठा धमाका केला. अमिताभ बच्चन यांच्यासोबत या चित्रपटात अनुपम खेर (Anupam Kher) हे देखील मुख्य भूमिकेत होते. अमिताभ बच्चन हे नेहमीच सोशल मीडियावर आपले मत मांडताना दिसतात.
अमिताभ बच्चन यांनी बाॅलिवूडमध्ये मोठा संघर्ष हा केला आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी बिग बी पोहचले होते. अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांचा काही दिवसांपूर्वीच गुडबॉय हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे थेट अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून रश्मिका मंदाना हिने बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे.
विशेष म्हणजे गुडबॉय या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलेच प्रेम दिले. गुडबॉय या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन हे वडिलांच्या भूमिकेत होते. अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यावर मोठे खलबतं सुरू आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी या अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यावर पोहचला. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी ममता बनर्जी यांना त्यांच्या घरी चहासाठी आमंत्रित केले होते.
विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांचे आमंत्रण स्वीकारत ममता बनर्जी पोहचल्या. बऱ्याच वेळ अमिताभ बच्चन आणि ममता बनर्जी यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे देखील सांगितले जात आहे. अमिताभ बच्चन यांना पश्चिम बंगालचे जावई म्हणूनही ओळखले जाते. आज ममता बॅनर्जी थेट विमानतळावरून अमिताभ बच्चन यांच्या जलसा येथील बंगल्यावर पोहोचल्या. बराच वेळ ममता बॅनर्जी आणि अमिताभ बच्चन यांच्यात बैठक सुरू होती.
ममता बॅनर्जी अमिताभ बच्चन यांना बंगालमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर देऊ शकतात, अशी एक चर्चा सध्या जोरदार रंगताना दिसत आहे. या बैठकीला राजकिय स्वरूप देखील प्राप्त झाले आहे. ममता बॅनर्जी आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये फार पुर्वीपासून काैटुंबिक संबंध आहेत. जया बच्चन आणि ममता बनर्जी यांच्यामध्येही चांगले रिलेशन आहे.