Aishwarya Rai and Abhishek Bachchan: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. ऐश्वर्या – अभिषेक यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांचं लग्न झालं. एकेकाळी चाहत्यांना फॅशन गोल्स देणारं कपल आता घटस्फोट घेणार आहेत… अशी चर्चा रंगली आहे. पण यावर ऐश्वर्या – अभिषेक यांनी अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण महानायक अमिताभ बच्चन यांच्या एका ट्विटमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर ब्लॉगच्या माध्यमातून मौन सोडलं होतं. ‘तर्क फक्त तर्क असतात… त्यामध्ये काहीही तथ्य नसतं…’ असं बिग बी म्हणाले होते. आता देखील बिग बी यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
T 5210 – चुप ! 😡
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 1, 2024
2 डिसेंबर 2024 रोजी अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केलं आहे. ‘चूप’ हाच एक शब्द अमिताभ बच्चन यांनी ट्विट केला आहे. शिवाय पुढे राग येणारा इमोजी देखील पोस्ट केला आहे. ऐश्वर्या राय हिने नावापुढील बच्चन आडनाव हटवल्यानंतर बिग बी यांनी ट्विट केलं आहे.
नुकताच एका इव्हेंटमध्ये ऐश्वर्या उपस्थित होती. तेव्हा अभिनेत्रीने बच्चन ऐवजी फक्त ‘ऐश्वर्या राय’ अशा नावाने स्वतःला संबोधित केलं. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना आणखी उधाण आलं. शिवाय सोशल मीडियावर अभिनेत्रीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यामुळे अभिनेत्रीचं खासगी आयुष्य चर्चेत असतं.
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये दोघांनी लग्न केलं आणि 2011 मध्ये ऐश्वर्याने लेक आराध्या हिला जन्म दिला. पण आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर दोघांनी देखील अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.