अमिताभ बच्चन यांची मोठी चूक; ज्यामुळे बिग बींना मागावी लागली माफी

| Updated on: Jan 09, 2023 | 2:58 PM

'त्या' एका चुकीमुळे अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी

अमिताभ बच्चन यांची मोठी चूक; ज्यामुळे बिग बींना मागावी लागली माफी
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : अभिनेते अमिताभ बच्चन ‘कोन बनेगा करोडपती १४’ शोमुळे तुफान चर्चेत असतात. पण आता शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ‘कोन बनेगा करोडपती १४’ शो बंद झाल्यानंतर ‘मास्टर शेफ’ शो सुरु होणार आहे. पण ‘केबीसी १४’ शो संपल्यानंतर देखील बिग बी पुन्हा चर्चेत आले आहेत. चर्चेत .येण्याचं कारण आहे बिग बीचं एक ट्विट. या ट्विटमुळे अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांची माफी मागितली आहे. जेव्हा बिग बींना कळालं की चुकीचा ट्विट पोस्ट झाला आहे. त्यानंतर त्यांनी माफी मागितली.

ट्विट करताना बिग बींची झालेली चूक म्हणजे त्यांनी त्या ट्विटला नंबर चुकीचा दिला होता. त्यानंतर एका ट्विट करत त्यांनी सर्वांची माफी मागितली, “T4515 मोठी चूक, T 4514 नंतर माझे पूर्वीचे सर्व ट्विट चुकले आहेत. T 5424,5425,5426,4527, 5428, 5429, 5430.. सर्व नंबर चुकीचे आहेत.. ते T4515,4516,4517,4518,4519 4520,452 असायला हवे होते. याबद्दल मी माफी मागतो.”

 

 

बिग बींच्या या ट्विटनंतर त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं, ‘एवढी मोठी चूक…’, तर दुसरा युजर कमेंट करत म्हाणाला, ‘बाजार उद्या कोसळेल!’… सध्या बिग बींचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या एका ट्विटमुळे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्रोलिंगचा सामना कराला लागत आहे.

बिग बी कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियावर देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. फक्त भारतातच नाही, तर साता समुद्रापार देखील अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. बिग बींना प्रत्येक सिनेमात वेगळ्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.

आता बिग बी लवकरच ‘आदिपुरुष’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. सिनेमात प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘आदिपुरुष’ शिवाय बिग बी ‘प्रोजेक्ट के’ सिनेमात प्रभास आणि अभिनेत्री दीपिका पादुकोनसोबत दिसणार आहे.