Amitabh Bachchan secret crush : एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा तुफान रंगल्या. आज देखील रेखा आणि अमिताभ बच्चन यांची जोडी चाहत्यांच्या लक्षात आहे. रेखा आणि अमिताभ बच्चन यांना फक्त रिल लाईफमध्येच नाही तर, रिअल लाईफमध्ये देखील चाहते आणि प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. आज दोघेही त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहेत, पण तरी देखील त्यांच्या नात्याची चर्चा काही कमी होत नाही. रेखा या बिग बींचं प्रेम होतं असं अनेकांना माहिती आहे. पण रेखा अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या क्रश कधीच नव्हत्या.
रेखा आणि बिग बींच्या नात्याची प्रत्येक गोष्ट आज त्यांच्या चाहत्यांना माहिती आहे. पण बिग बी याचं पहिलं क्रश कोणती अभिनेत्री हे फार कमी लोकांना माहिती आहे. पहिल्या क्रशबद्दल खुद्द अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला आहे. बिग बींनी सांगितलं आहे की, त्यांच्या आयुष्यातील पहिलं क्रश कोण होतं. (amitabh bachchan and rekha )
या गोष्टीचा खुलासा करताना अमिताभ बच्चन यांनी रेखा किंवा जया बच्चन यांचं नाव घेतलं नाही. बिग बींनी ज्या अभिनेत्रीचं नाव घेतलं, ते ऐकून अनेक जण हैराण झाले. तर आज जाणून घेवू अमिताभ बच्चन यांच्या जीवनातील त्या खास अभिनेत्रीबद्दल जिने एकेकाळी बिग बींच्या मनात घर केलं होतं.
गेल्या अनेक वर्षांपासून बिग बी त्यांच्या प्रत्येक सिनेमात मुख्य भूमिकेत दिसतात. शिवाय अनेक जाहिराती आणि रिऍलिटी शोमध्ये देखील त्यांनी स्वतःचा जलवा दाखवला आहे. एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र बिग बींची चर्चा असायची. आज देखील त्यामध्ये काही कमतरता झालेली दिसून येत नाही. बिग बी कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आले.
रेखा यांच्यासोबत असलेलं रिलेशनशिप आणि जया बच्चन यांच्यासोबतचे अनेक किस्से आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. पण काही दिवसांपूर्वी रिऍलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती 14’ (Kaun Banega Crorepati 14) ऑफ-एयर गेला आहे. शो दरम्यान एका स्पर्धकाने बिग बींना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले.
स्पर्धकाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अमिताभ बच्चन यांनी विनोदी अंदाजात दिलं. त्यानंतर स्पर्धकाने बिग बी यांना त्यांच्या आयुष्यातील ‘सेलिब्रिटी क्रश’ बद्दल विचारलं. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी दिलेलं उत्तर फार सर्वांना हैराण करणारं होतं. ‘सेलिब्रिटी क्रश’चं नाव घेतलाना अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन, रेखा यांचं नाव न घेता अभिनेत्री वहीदा रहमान यांचं नाव घेतलं .
सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन यांची आवडती अभिनेत्री वहीदा रहमान या आहेत. अमिताभ बच्चन यांच्या अनेक सिनेमांमध्ये वहीदा रहमान यांनी आईची भूमिका साकरली आहे. वहीदा रहमान देखील आज चाहत्यांमध्ये चर्चेत असतात.