मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतात. ते आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काही कविता, फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर चांगल्या मित्राची व्याख्या सांगितली आहे. अमिताभ बच्चन म्हणाले की, एका चांगल्या मित्राची तुलना पांढऱ्या रंगासोबत केली जाऊ शकते कारण पांढऱ्या रंगामध्ये इतर कोणतेही रंग मिसळून रंग तयार करू शकतो मात्र, कोणत्याही रंगाच्या सहाय्याने पांढरा रंग तयार करता येत नाही. (Amitabh Bachchan defines a good friend)
T 3807 – “अच्छे दोस्त सफ़ेद रंग जैसे होते हैं,
सफ़ेद में कोई भी रंग मिलाओ तो नया रंग बन सकता है,
लेकिन दुनिया के सभी रंग मिलाकर भी सफ़ेद रंग नहीं बना सकते।”
~ Ef sanjP kol— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 7, 2021
अमिताभ बच्चन यांनी अलिकडेच एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. व्हिडीओमध्ये चिमुकली एका हरियाणी गाण्यावर डान्स करताना दिसत होती. अडीच मिनिटांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होता. व्हिडीओ शेअर करताना अमिताभ बच्चन लिहिले होते की, ‘…शो मस्ट गो ऑन!’ चिमुकली डान्समध्ये एवढी मग्न झाली आहे की, डान्स करताना चप्पल पायातून निघाली, तरी चिमुकली तिचा डान्स थांबवताना दिसत नाही. डान्स करताना चिमुकलीचे चेहऱ्यावरील हावभाव, कंबरेचे ठुमके आणि डान्स करण्याची ताकद पाहुण अमिताभ बच्चन यांनी तिचे कौतुक केले होते.
अमिताभ बच्चन सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात, अनेक प्रसंगी ते चाहत्यांना प्रोत्साहित करतानाही दिसतात. अमिताभ बच्चन त्यांच्या सर्व चाहत्यांच्या संपर्कात असतात. एखाद्या चाहत्याने चांगला व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर केला की अमिताभ बच्चन त्यांचे कौतुक करतात. त्यावेळी त्या व्यक्तीचे आयुष्यच बदलून जाते.
संबंधित बातम्या :
तलवारीनंतर कंगनाच्या हातात बंदूक ‘धाकड’ चा फोटो शेअर आणि म्हणाली- मृत्यूची देवी…
आजारातून उठताच रेमो डिसूझाचा काळ्या रंगावरून धक्कादायक खुलासा, म्हणाला….!
करण जोहरच्या मुलांच्या बर्थ डे पार्टीत तैमुरची हजेरी, अनेक स्टारकिडची हजेरी, पाहा फोटो…
(Amitabh Bachchan defines a good friend)