मुंबई | 15 ऑगस्ट 2023 : बच्चन कुटुंबातील सदस्य कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची चर्चा रंगत आहे. आता देखील महानायक अमिताभ बच्चन यांनी मुलासाठी ब्लॉगच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहे. दरम्यान, बिग बी यांच्या डोळ्यात पाणी देखील आलं. तर तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, अभिषेक याने असं काय केलं, जे पाहून बिग बी भावुक झाले. तर अभिषेक लवकरच ‘घूमर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. याबद्दल महानायक यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
ब्लॉगमध्ये मुलाचा उल्लेख करत बिग बी म्हणाले, ‘मी घूमर सिनेमा सलग दोन वेळा पाहिला. रविवारी दुपारी आणि रात्री…. जेव्हा तुमचा मुलागा संबंधीत गोष्टीचा भाग असेल तर ते अविश्वसनीय असतं.. तुम्ही स्वतःची नजर देखील हटवू शकत नाही. सिनेमा पाहिल्यानंतर मी माझे विचार तुमच्यासोबत शेअर केल्याशिवाय स्वतःला थांबवू शतक नाही.. माझे डोळे पाणावले आहेत…’
पुढे बिग बी म्हणाले, ‘सिनेमा क्रिकेट खेळाशी निगडीत असून एक मुलगी आणि तिच्या महत्वाकांक्षांवर आधारित कथेवर सिनेमा फिरत आहे. आर बाल्की यांनी अतिशय कठीण मुद्दा सोप्या पद्धतीने आपल्यासमोर मांडला आहे. हारल्यावर काय भावना असतात मला माहिती आहे.. आता जिंकल्यावर विजेत्याच्या भावना कशा असतात हे मला पाहायचं आहे…’
‘आपण प्रत्येकाने अपयशाचा सामना केला आहे. तेव्हा भावना काय असतात आपल्याला माहिती आहेत. पण जेव्हा विजेता यशस्वी होतो. तेव्हा काय भावना असतात… हे आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत आपण सर्वजण त्यासाठी लढतो आणि जेव्हा आम्हाला दरवाजा बंद असल्याचं कळतं.. तेव्हा आपण तो तोडतो…’
अभिषेक बच्चन स्टारर ‘घूमर’ सिनेमाला नुकतेच मेलबर्न २०२३ च्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्टँडिंग ओव्हेशन मिळाले आहे. या सिनेमात अभिषेक बच्चन व्यतिरिक्त शबाना आझमी आणि अंगद बेदी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘घूमर’ सिनेमा १८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.