KBC 15 | ‘केबीसी’मध्ये अमिताभ बच्चन यांच्यावर किती होतो खर्च? एका दिवसाची कमाई थक्क करणारी

| Updated on: Aug 26, 2023 | 9:19 AM

KBC 15 | केबीसी शोमध्ये अमिताब बच्चन यांच्यावर केला जातो मोठा खर्च; बिग बी एका एपिसोडसाठी घेतात इतकं मानधन... सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन यांच्या कमाईची चर्चा...

KBC 15 | केबीसीमध्ये अमिताभ बच्चन यांच्यावर किती होतो खर्च? एका दिवसाची कमाई थक्क करणारी
kbc big b
Follow us on

मुंबई | 26 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज देखील त्यांचे सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहतात. फक्त सिनेमेच नाही तर, अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून ‘केबीसी’ या शोच्या होस्तची जबाबदारी पार पाडत आहेत. शोमध्ये ज्ञानासोबतच मनोरंजन होत असल्यामुळे ‘कोन बनेगा करोडपती’ शोची लोकप्रियता गगनाला भिडली आहे. ‘कोन बनेगा करोडपती’ शोची वाटचाल अमिताभ बच्चन यांच्यामुळे यशस्वीरित्या पुढे सुरु आहे. तर शोच्या माध्यमातून बिग बी यांची किती कमाई होते. शिवाय शो एका एपिसोडसाठी किती खर्च केला जातो… याची चर्चा कायम रंगलेली असते.

‘कोन बनेगा करोडपती’ शोबद्दल सांगायचं झालं तर, २००० मध्ये ‘केबीसी’ शोची सुरुवात झाली हाती. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी होस्ट म्हणून जबाबदारी स्वीकारली. यानंतर मधल्या एका सीझनसाठी शाहरुख खान याची होस्टची भूमिका बजावली. पण अमिताभ बच्चन यांची जागा किंग खान घेवू शकला नाही. त्यानंतर ‘केबीसी’ शोचा एकही एपिसोड बिग बींशिवाय शूट झाला नाही.

‘कोन बनेगा करोडपती’ हा शो पूर्णपणे अमिताभ बच्चन यांच्यावर अवलंबून आहे.. अस म्हणायला हरकत नाही. शोच्या शुटिंग दरम्यान, बिग बींवर लाखो रुपये खर्च केला जातो. रिपोर्ट्सनुसार, ‘कोन बनेगा करोडपती’ शोच्या एका एपिसोडसाठी जवळपास १० लाख रुपये खर्च केले जातात.. असं सांगण्यात आलं.

‘कोन बनेगा करोडपती’ शोमध्ये अमिताभ बच्चन यांचा ड्रेस व्यवस्थित आणि स्वच्छ असतो. अनेकवेळा ते वेगवेगळ्या आउटफिट्समध्येही दिसतात. बिग बी यांचा ड्रेस परदेशातून येतो. त्यांच्याकडे वैयक्तिक स्टायलिस्ट देखील आहेत. प्रत्येक सीझनमध्ये स्टायलिस्ट बदलत राहतात. तर एका शोच्या एका एपिसोड बिग बी बक्कळ मानधन घेतात.

एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात अमिताभ बच्चन?

अमिताभ बच्चन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, बिग बी आता ८० वर्षांचे झाले आहेत. वयाच्या ८० व्या वर्षी देखील बिग बी यांचा उत्साह तरुणांप्रमाणे असतो. आजही बिग बी सिनेमे, जाहिराती आणि केबीसी शो देखील उत्साहाने होस्ट करताना दिसतात. गेल्या अनेक वर्षांपासून बिग बी केबीसी शोच्या होस्टची भूमिका बजावत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन एका दिवसासाठी सुमारे ६ कोटी रुपये घेतात. सध्या केबीसीचा १५वा सीझन सुरू आहे. बिग बी सध्या केबीसीमुळे चर्चेत आहे. बिग बी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.