Amitabh Bachchan | ‘बिग बी’ने फोटो शेअर करत उडवली स्वत:चीच खिल्ली, थेट म्हणाले, एआय रोबोट

| Updated on: Jun 12, 2023 | 6:52 PM

बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे नेहमीच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन हे चित्रपटांमध्ये धमाकेदार अभिनय करतात पण गेल्या काही वर्षांपासून अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

Amitabh Bachchan | बिग बीने फोटो शेअर करत उडवली स्वत:चीच खिल्ली, थेट म्हणाले, एआय रोबोट
Follow us on

मुंबई : बाॅलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे कायमच चर्चेत असतात. विशेष म्हणजे वयाच्या 80 व्या वर्षीही जबरदस्त भूमिका करताना अमिताभ बच्चन हे कायमच दिसतात. धमाकेदार पध्दतीने अमिताभ बच्चन हे अजूनही आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. अमिताभ बच्चन यांची फॅन फाॅलोइंग (Fan following) ही जबरदस्त अशी आहे. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरही चांगली सक्रिय दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी खास पोस्ट शेअर नेहमीच अमिताभ बच्चन हे करतात. इतकेच नाही तर बऱ्याच वेळा चाहत्यांचे काैतुक देखील अमिताभ बच्चन करतात. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर (Social media) नेहमीच सक्रिय असतात.

काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन हे मुंबईमध्ये गाडीवर फिरताना दिसले होते. विशेष म्हणजे चक्क एका चाहत्याच्या गाडीवर अमिताभ बच्चन हे फिरत होते. हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला होता.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे अमिताभ बच्चन याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळाले. कारण या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन यांनी हेल्मेट घातले नव्हते. हेल्मेट घातले नसल्यामुळे अमिताभ बच्चन यांच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई करत त्यांना दंड आकारला. यादरम्यान अनुष्का शर्मा ही देखील गाडीवर मुंबईत हेल्मेट न घालता फिरताना दिसली होती.

नुकताच अमिताभ बच्चन यांनी इंस्टावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांचा 90 च्या दशकातील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी स्वत:लाच थेट एआय रोबोट म्हटले आहे. अमिताभ बच्चन यांनी हा फोटो शेअर करत म्हटले की, हाहाहा…. ज्याने मला हा फोटो पाठवला आहे त्यांने हा फोटो इतक्या जबरदस्त पद्धतीने एडिट केला आहे की, मला एआय रोबोट दाखवत आहे हाहाहा…

आता अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट देखील केल्या आहेत. अनेकांनी अमिताभ बच्चन हे बरोबर बोलत असल्याचे देखील म्हटले आहे. अमिताभ बच्चन यांच्या हा फोटो अनेकांना आवडलाय. अमिताभ बच्चन आणि साऊथचे सुपरस्टार रजनीकांत हे लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.