मुंबई : बाॅलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर हे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाची स्टोरी चार मित्रांच्या भोवती फिरताना दिसली. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर देखील कायमच सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसाठी खास व्हिडीओ (Video) आणि कविता शेअर करताना दिसतात.
अमिताभ बच्चन यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. अमिताभ बच्चन यांचा काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला होता. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन हे एका चाहत्याच्या गाडीवर मुंबईमध्ये फिरताना दिसले.
हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमिताभ बच्चन याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली होती. कौन बनेगा करोडपती हा शो अत्यंत मोठ्या काळापासून सुरू आहे. विशेष म्हणजे कौन बनेगा करोडपतीच्या पहिल्या सीजनपासून अमिताभ बच्चन हेच हा शो होस्ट करताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे कौन बनेगा करोडपती हा शो नेहमीच चर्चेत असतो. या शोसाठी अमिताभ बच्चन तगडी फिस घेतात. विशेष म्हणजे कौन बनेगा करोडपतीच्या पहिल्या सीजनला अमिताभ बच्चन यांनी 25 लाख रूपये घेतले होते. यानंतर लोकांचा प्रतिसाद या शोला सतत मिळताना दिसला. कौन बनेगा करोडपतीच्या दुसऱ्या सीजनला अमिताभ बच्चन यांनी 1 कोटी रूपये फिस घेतली. त्यानंतर सतत त्यांच्या फिसमध्ये वाढ झाली.
रिपोर्टनुसार अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपतीच्या 6 व्या आणि 7 व्या सीजनला 1.5 ते 2 कोटी रूपये फिस घेतली. कौन बनेगा करोडपतीच्या 8 व्या सीजनला अमिताभ बच्चन यांनी 2 कोटी फिस घेतली. 9 व्या सीजनला अमिताभ बच्चन यांनी 2.6 कोटींची फिस घेतली होती. 10 सीजनला 3 कोटी.
कौन बनेगा करोडपतीच्या 11 व्या, 12 व्या आणि 13 सीजनला अमिताभ बच्चन यांनी 3.5 कोटी फिस घेतल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलय. कौन बनेगा करोडपती शोच्या विजेत्याला देखील अत्यंत मोठी रक्कम दिली जाते. चाहते कायमच कौन बनेगा करोडपतीच्या नव्या सीजनची वाट पाहताना दिसतात.