मुंबई : महानायक अमिताभ बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता साता समुद्रा पार पोहोचली आहे. बिग बी कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. अमिताभ बच्चन कायम त्यांच्या आयुष्यातील चांगल्या वाईट घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. पण आता सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्यावर तयार करण्यात आलेला मीम तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन यांच्यावर तयार करण्यात आलेल्या मीमची चर्चा रंगत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मीममध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत ४ अन्य व्यक्ती देखील दिसत आहेत. मीममध्ये बिग बी यांच्यासोबत ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी, रेखा, जया बच्चन आणि सुषमा स्वराज देखील दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मीम पाहून चाहते पोट धरुन हसताना दिसत आहेत. मीम देसी नारी या इन्स्टाग्रान अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. सर्वत्र बिग बी यांची चर्चा रंगत आहे.
काही दिवसांपूर्वी हानायक अमिताभ बच्चन यांचा हैदराबाद याठिकाणी ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना अपघात झाला. वयाच्या ८० व्या वर्षी ॲक्शन सीन शुट करताना बिग बींचा अपघात झाला.बिग बींच्या अपघाताची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचल्यानंतर चाहते चिंता व्यक्त केली. सध्या बिग बी त्यांच्या राहत्या घरी आराम करत आहेत.
बिग बीच्या अपघातानंतर ‘प्रोजेक्ट K’सिनेमावर मोठं संकट आलं आहे. सिनेमात बिग बींसोबत अभिनेता प्रभास, दीपिका पादुकोण, दिशा पटानी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘प्रोजेक्ट K’ सिनेमाची शुटिंग २०२१ मध्ये सुरु झाली. पण कोरोना असल्यामुळे सिनेमाचं शुटिंग पूर्ण होवू शकलं नाही. आता बिग बी जखमी झाल्यामुळे सिनेमाचं शुटिंग थांबलं आहे.
‘प्रोजेक्ट K’ सिनेमा ५०० रुपयांच्या बजेटमध्ये साकारण्यात येत आहे. ‘प्रोजेक्ट K’सिनेमा भारतातील सर्वांत जास्त बजेट असलेला सिनेमा असल्याचं सांगण्यात येत आहे. ‘प्रोजेक्ट K’सिनेमा १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या बिग बी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत.