Amitabh Bachchan : ‘हमारा घर मिनी इंडिया की तरह’, असं का म्हणाले अमिताभ बच्चन?

| Updated on: Oct 26, 2023 | 1:42 PM

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत, आता देखील महानायक त्यांच्या कुटुंबामुळे आले आहेत चर्चेत... 'हमारा घर मिनी इंडिया की तरह', या वक्तव्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांची चर्चा...

Amitabh Bachchan : हमारा घर मिनी इंडिया की तरह,  असं का म्हणाले अमिताभ बच्चन?
Follow us on

मुंबई : 26 ऑक्टोबर 2023 : महानायक अमिताभ बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील बिग बी एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. ‘हमारा घर मिनी इंडिया की तरह’ असं वक्तव्य अमिताभ बच्चन यांनी केलं आहे. अमिताभ बच्चन यांनी ‘कोन बनेगा करोडपती’ शोमुळे तुफान चर्चेत आहेत. शोमध्ये आलेल्या प्रत्येक स्पर्धकांसोबत बिग बी मनमोकळ्या गप्पा देखील मारतात. आता देखील अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कुटुंबाबद्दल मोठी गोष्ट चाहत्यांनी सांगितली आहे. शोमध्ये उपस्थित असलेल्या स्पर्धक अमिताभ बच्चन यांना म्हणाला, ‘पत्नी आणि सूनेच्या भांडणामध्ये माझं सँडवीच होतं…’ यावर बिग बी यांनी देखील उत्तर दिलं …

पत्नी आणि सूनेच्या भांडणांचा उल्लेख करत स्पर्धकाने, ‘तुमच्या घरात देखील अशी परिस्थिती असते का?’ असा प्रश्न विचारला. यावर अमिताभ बच्चन म्हणाले, ‘मी समजू शकते. माझं देखील घरात सर्वांमध्ये सँडविच होतं. पण मला जे आवडते ते म्हणजे माझं कुटुंब वैविध्यपूर्ण आहे.’

पुढे बिग बी म्हणाले, ‘माझ्या मुलीचं लग्न पंजाबी कुटुंबात झालं आहे, तर माझ्या मुलाचं लग्न साऊथ इंडियन कुटुंबात… माझ्या घरात वेग-वेगळ्या ठिकाणचे लोक आहेत. आमचं कुटुंब एका लहान भारतासारखं आहे आणि आम्हाला आमचं कुटुंब प्रचंड आवडतं…’ असं देखील अमिताभ बच्चन म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, बिग बींची मुलगी श्वेता बच्चन हिचं लग्न निखिल नंदा यांच्यासोबत झालं आहे. तर अभिषेक बच्चन याचं लग्न अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत झालं आहे. बिगी बी कायम त्यांच्या कुटुंबासोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

अमिताभ बच्चन यांचे आगामी सिनेमे

अमिताभ यांच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, बिग बी नुकताच, ‘गणपत’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले होते. आता अमिताभ बच्चन लवकरच ‘प्रोजेक्ट’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. ‘प्रोजेक्ट’ शिवाय बिग बी The Umesh Chronicles, कल्की 2898AD, बटरफ्लाय, थलायवर 170 यांसारख्या सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत.