अंबानींच्या लग्नानंतर अमिताभ बच्चन यांची लक्षवेधी पोस्ट; म्हणाले, ‘त्यांच्या चेहऱ्यांमध्ये झालेले बदल…’

| Updated on: Jul 13, 2024 | 2:25 PM

Amitabh Bachchan Post: अंबानींच्या लग्नात सून आणि नातीसोबत नाही दिसलं बच्चन कुटुंब, लग्नातूननंतर अमिताभ बच्चन म्हणाले, 'त्यांच्या चेहऱ्यांमध्ये झालेले बदल...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या पोस्टची चर्चा..

अंबानींच्या लग्नानंतर अमिताभ बच्चन यांची लक्षवेधी पोस्ट; म्हणाले, त्यांच्या चेहऱ्यांमध्ये झालेले बदल...
Follow us on

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन संपूर्ण कुटुंबासोबत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात सामिल झाले होते. बिग बी यांनी नात नव्या नंदा आणि नातू अगस्त्य नंदा यांच्यासोबत पोज दिल्या. पण बच्चन कुटुंब ऐश्वर्या आणि आराध्या यांच्यासोबत दिसलं नाही. आराध्या आणि ऐश्वर्या कुटुंबाशिवाय अंबानींच्या लग्नात सामिल झाल्या होत्या. लग्नानंतर अमिताभ बच्चन यांनी एक लक्षवेधी पोस्ट केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

अमिताभ बच्चन यांनी पहाटे 4 च्या दरम्यान सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. अंबानींच्या लग्नाचा अनुभव शेअर करत बिग बी म्हणाले, ‘ या अलौकिक काळातही जोडण्याची इच्छा आणि इच्छा काहींसाठी… अनेकांसाठी ही कामाची वेळ आहे… परंतु माझ्यासाठी मला EF कनेक्टसाठी वेळ वापरावा लागेल. अनेक दिवसांनंतर अनेकांची झालेली भेट, प्रेम आणि स्नेह… ज्यामुळे जुन्या नात्यांचा पुन्हा विचार करू शकतो…’

हे सुद्धा वाचा

 

 

‘असं वाटत आहे की, त्यांच्या चेहऱ्यांमध्ये आता बदल झाले आहेत. पण आमच्यात आसलेलं प्रेमळ नाते आजही खूप प्रामाणिक आहेत. यालाच जीवन असं म्हणतात. याच छोट्या – छोट्या गोष्टी एकमेकांसाठी फार महत्त्वाच्या असतात.’ असं देखील बिग बी म्हणाले. सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सांगायचं झालं तर, अंबानींच्या कोणत्याही कार्यक्रमात बच्चन कुटुंब मोठ्या आनंदाने हजेरी लावतात. अंबानी आणि बच्चन कुटुंबाचे नाते देखील फार खास आहे. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी, मुलगी ईशा अंबानी यांच्या लग्नात देखील बच्चन कुटुंब उपस्थित होतं.

अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांचं लग्न 

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांनी लग्नाचा निर्णय घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा होती.  दोघांच्या प्री-वेडींग सेलिब्रेशनसाठी देखील बच्चन कुटुंब जामनगर याठिकाणी पोहोचलं होतं. तेव्हा आराध्या हिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सध्या सर्वत्र फक्त अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांचं लग्न आणि अभिषेक बच्चन – ऐश्वर्या राय यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.