मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : ‘कोन बनेगा करोडपती’ शो गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं ज्ञान वाढवत असून मनोरंजन देखील होतं. शोला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम देखील मिळतं. २००० मध्ये सुरु झालेल्या शोने अनेकांच्या मनात घर केलं आहे. गेल्या २४ वर्षांपासून शोची यशस्वी वाटचाल सुरु आहे. आता ‘कोन बनेगा करोडपती’ शोच्या १५ व्या सीझनला देखील प्रेक्षकांकडून प्रेम मिळत आहे. स्टार प्लसवर सुरु झालेल्या शोने ८ व्या सीझननंतर ब्रेक घेतला होता. त्यानंतर ‘कोन बनेगा करोडपती’ शो सोनी टीव्हीवर प्रसारित होण्याची सुरुवात झाली. दरम्यान शोच्या एका सीझनच्या होस्टची जबाबदारी अभिनेता शाहरुख खान याच्या खांद्यावर होती. पण किंग खान अमिताभ बच्चन यांची जागा घेवू शकली नाही.
कौन बनेगा करोडपती शोचं शुटिंग बहुतांश मुंबईतील फिल्मसिटीमध्ये होतं. पण २०१४ मध्ये शोच्या निर्मात्यांनी केबीसीचं शुटिंग मुंबईबाहेर सूरत आणि रायपूर येथे केलं होतं. पण २०१५ पासून पुन्हा शोच्या शुटिंगची सुरुवात मुंबईतील फिल्मसिटीमध्ये झाली. ‘दादासाहेब फाळके फिल्मसीटी’मध्ये केबीसी शोचं शुटिंग होतं. फिल्मसीटीच्या एका स्टुडिओमध्ये केबीसीचा सेट तयार करण्यात आला असून केबीसी हिंदीसोबतच केबीसी मराठीचं देखील शुटिंग होतं.
Itihaas mein pehli baar, prashnon ka saamna karega aapka parivaar. Toh kar lijiye taiyaari, kyunki ab #FamilyWeekSpecial mein milkar khelne ki hai baari!
To register, click on the link in bio. pic.twitter.com/h1s2udpfYk
— sonytv (@SonyTV) August 17, 2023
फिल्मसीटी आणि केबीसीच्या सेटवर प्रेवश मिळवणं सहज सोपं नाही. केबीसीच्या सेटवर पूर्ण सुरक्षेची काळजी घेतली जाते. सेटवर जाण्याची कोणालाही परवानगी नाही. रिऍलिटी शोमध्ये जवळपास २०० ते २५० प्रेक्षक असतात. पण केबीसीमध्ये फक्त आणि फक्त ८० ते १२० प्रेक्षकांना एन्ट्री दिली जाते. प्रेक्षकांमध्ये, शोमध्ये सहभागी होणारे १० स्पर्धक (फास्टेस्ट फिंगर फर्स्टमध्ये सहभागी होणारे स्पर्धत), त्यांचे कुटुंबीय आणि मित्र यांना प्राधान्य दिलं जातं.
अमिताभ बच्चनचा केबीसी हा असा शो आहे जिथे पैसे देवून प्रेक्षकांना बोलावण्यात येत नाहीय. बँक आणि फायनान्सच्या अधिकाऱ्यांपासून ते बिग बींचे चाहते चॅनलशी संपर्क साधून शोमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्हालाही या शोमध्ये प्रेक्षक म्हणून सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला चॅनलला मेल करावा लागेल.
कौन बनेगा करोडपती हा सोनी टीव्हीचा असाच एक शो आहे, ज्याचे प्रायोजक दिवसेंदिवस वाढतच आहेत. गेल्या वर्षी या शोला सुमारे ४०० कोटींची जाहिरात कमाई मिळाली होती. सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन यांच्यामुळे शोची लोकप्रियता गगनाला भिडली आहे. रिपोर्ट्सनुसार, ‘कोन बनेगा करोडपती’ शोच्या एका एपिसोडसाठी जवळपास १० लाख रुपये खर्च केले जातात.. असं सांगण्यात आलं.
गेल्या अनेक वर्षांपासून बिग बी केबीसी शोच्या होस्टची भूमिका बजावत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन एका एपिसोडसाठी सुमारे ६ कोटी रुपये घेतात. सध्या केबीसीचा १५वा सीझन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र ‘कोन बनेगा करोडपती 15’ ची चर्चा रंगली आहे.