मुंबई : बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी लाखो लोकांच्या मनावर राज्य केले आहे. अमिताभ यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज वयाच्या या टप्प्यावरही ते धडाडीने काम करतना दिसतात. 2020मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत बिग बी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर यशस्वी मात करणाऱ्या मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी आपल्या कुटुंबासमवेत कोरोना लसीचा पहिला डोस (Corona Vaccination) घेतला आहे (Amitabh Bachchan vaccine Big B share Corona Vaccination Photo on social media).
बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स सध्या कोरोनाची लस घेत आहेत. अभिनेता सैफ अली खाननंतर (Saif Ali Khan) सलमान खान (Salman Khan), रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि आता अमिताभ बच्चन (अमिताभ बच्चन) यांचे नाव देखील या यादीमध्ये सामील झाले आहेत.
T 3861 –
Got it done !
My CoviD vaccination this afternoon ..
All well .. ?— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 1, 2021
कोरोना लसीचा पहिला डोस घेणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये आता अमिताभ बच्चन यांचे नाव देखील सामील झाले आहे. त्यांनी शुक्रवारी सकाळी ब्लॉग लिहून आपला लसीकरण अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ब्लॉगद्वारे बिग बी म्हणाले की, त्यांनी कोरोनाची लस घेतली आहे.
अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, केवळ त्यांनाच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही कोरोनाची लास दिली गेली आहे. मात्र, अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या मुंबईत नसल्याने त्याची लसीकरणाची संधी हुकली आहे. कोरोन लसीकरणाची माहिती देताना बिग बी म्हणतात, ‘लसीकरण झाले.. सर्व काही ठीक आहे.. काल कुटुंब आणि सगळ्या कर्मचाऱ्यांची कोरोन चाचणी झाली होती.. त्याचा निकाल आज आला.. सर्व ठीक आहेत, सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. त्यामुळे लसीकरण झाले आहे. अभिषेक वगळता कुटुंबातील सर्व सदस्यांना लस दिली गेली आहे.’(Amitabh Bachchan vaccine Big B share Corona Vaccination Photo on social media)
यासोबतच अमिताभ बच्चन यांनीही त्यांचा लसीचा डोस घेतनाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये रुग्णालयातील कर्मचारी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लस देताना दिसत आहेत. यावेळी बिग बींनी पांढरा कुर्ता पायजमा, हेड गियर आणि मोठा चष्मा परिधान केलेला दिसतो आहे. तसेच, हा फोटो देखील ब्लॅक अँड व्हाईट आहे.
गेल्या वर्षी अमिताभ, अभिषेक, त्यांची सून ऐश्वर्या राय (Aishwarya Roy-Bachchan) आणि नातू आराध्या यांना कोरोनाची लागण झाली होती. तर, अमिताभ आणि अभिषेक यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर ऐश्वर्या आणि आराध्याही नंतर रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. अभिषेकला यातून बरे होण्यासाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी लागला होता.
‘नॅशनल क्रश’ ठरलेली दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna ) आता बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमवणार आहे. एकामागून एक मोठे चित्रपट रश्मिकाच्या पदरात पडले आहेत. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासमवेत रश्मिका पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. ‘गुडबॉय’ या चित्रपटात रश्मिका आणि अमिताभ बच्चन एकत्र दिसणार आहेत. अमिताभ यांच्या डोळ्यांच्या ऑपरेशनमुळे चित्रपटाच्या शूटिंगला पुढे ढकलण्यात आले होते.
चित्रपटाच्या मुख्य भागाचे चित्रीकरण चंदीगडमध्ये होणार आहे. तसेच, शहरातील चित्रीकरणासाठी काही भाग मुंबईतील एका स्टुडिओमध्ये बनवण्यात आले आहेत. पहिले वेळापत्रक सुमारे एक महिना सुरु असणार आहे. तर, त्यानंतर कलाकार चंदिगड आणि हरिद्वार येथे स्वतंत्र कार्यक्रमांसाठी जातील. याआधी पहिले शेड्युल 23 मार्चपासून सुरू होणार होते.
(Amitabh Bachchan vaccine Big B share Corona Vaccination Photo on social media)
अभिनेते कादर खान यांच्या मोठ्या मुलाचे निधन, कॅनडामध्ये अखेरचा श्वास