मुंबई : अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चन (Shweta Bachchan) हिची मुलगी नव्या नवेली नंदा ही कायमच चर्चेत असते. नव्या नवेली नंदा ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना नव्या नवेली नंदा ही दिसते. नव्या नवेली नंदा ही एक एनजीओ चालवते. काही दिवसांपूर्वी थेट ग्रामीण भागातील महिलांसोबत संवाद साधताना नव्या नवेली नंदा दिसली. नव्या नवेली नंदाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
नव्या नवेली नंदा ही काही दिवसांपूर्वीच साऊथमध्ये धमाल करताना दिसली. आपल्या खास मित्र आणि मैत्रिणींसोबत धमाल करताना नव्या नवेली नंदा दिसली. नव्या नवेली नंदा हिने काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर केले. नव्या नवेली नंदा ही बाॅलिवूडमध्ये काम करताना दिसणार नाहीये, तिला अभिनयामध्ये फार काही रस नसल्याचे तिने स्पष्ट केलंय.
नव्या नवेली नंदा हिने नुकताच पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभाग घेतला. यावेळीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. यावेळी सोशल मीडियावर लोक तिच्या रॅम्प वॉकवर कमेंट करताना दिसले. अनेकांनी थेट म्हटले की, अजून सुधारणा करण्याची गरज नव्या नवेली नंदा हिला आहे.
एकाने लिहिले की, पुढच्या वेळी रॅम्प वॉक शिकण्यासाठी थोडे प्रयत्न कर… कारण तू नक्कीच बेस्ट नाहीस. अजून एकाने लिहिले की, नव्या नवेली नंदा तुला नक्कीच अजून प्रशिक्षणाची गरज आहे. यावर थेट नव्या नवेली नंदा हिने रिप्लाय देत लिहिले की, ओके. नव्या नवेली नंदा हिची आई श्वेता बच्चन हिने देखील या पोस्टवर कमेंट केलीये.
श्वेता बच्चन हिने लिहिले की, नव्या नेहमीच तुझ्या मनाचे ऐकत जा…जेंव्हाही तू असे काही करतेस तेंव्हा तू सर्वाधिक चमकतेस. नव्या मला नक्कीच तुझा खूप जास्त अभिमान आहे. यावर उत्तर देत नव्या हिने लव्ह यू मॉम लिहिले. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हा लवकरच बाॅलिवूड चित्रपटांमध्ये धमाका करताना दिसणार आहे.