मुंबई : बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) ही नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच नव्या नवेली नंदा हिने आजोबा अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका जाहिरातीमध्ये काम केले होते. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुलगी श्वेता बच्चन हिने या जाहिरातीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत नव्या नवेली नंदा हिचे काैतुक केले होते. काही दिवसांपूर्वीच नव्या नवेली नंदा आणि तिची आई श्वेता बच्चन (Shweta Bachchan) या काैन बनेंगा करोडपती शोमध्ये आल्या होत्या. यावेळी अमिताभ बच्चन यांचे अनेक गुपिते उघड करताना नव्या नवेली नंदा ही दिसली होती.
नव्या नवेली नंदा ही नेहमीच आजोबा अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे खास फोटो शेअर करते. मुळात म्हणजे नव्या नवेली नंदा ही बाॅलिवूडच्या चित्रपटांपासून दूर आहे. नव्या नवेली नंदा हिला अभिनयाची फार काही आवड नाहीये. मात्र, असे असताना देखील नव्या नवेली नंदा ही बाॅलिवूडच्या अनेक पार्ट्यांना हजेरी लावताना दिसते. नव्या नवेली नंदा आणि शाहरूख खान याची मुलगी सुहाना खान या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.
नव्या नवेली नंदा ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. नव्या नवेली नंदा हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. नव्या नवेली नंदा ही आपल्या चाहत्यांसाठी कायमच फोटो आणि खास व्हिडीओ शेअर करताना दिसते. नव्या नवेली नंदा ही एका सामाजिक संस्थेसोबत काम करते आणि ती एनजीओ देखील चालवते.
नुकताच अमिताभ बच्चन यांच्या नातीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. नव्या नवेली नंदा हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये चक्क ती ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. नव्या नवेली नंदा हिने ट्रॅक्टरचे स्टेरिंग आपल्या हातामध्ये घेतले आहे. या व्हिडीओमध्ये नव्या नवेली नंदा ही शेतामध्ये ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. पुढे या व्हिडीओमध्ये नव्या नवेली नंदा ही महिलांसोबत संवाद साधताना देखील दिसत आहे.
बाजेवर बसून महिलांच्या समस्या जाणून घेताना नव्या नवेली नंदा ही दिसत आहे. विशेष म्हणजे व्हिडीओमध्ये काही वयस्कर महिला या नव्या नवेली नंदा हिला फुले देऊन तिचे स्वागत करताना देखील दिसत आहे. पांढऱ्या रंगाच्या एकदम साध्या कपड्यांमध्ये नव्या नवेली नंदा दिसत आहे. नव्या नवेली नंदा हिचा हा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला असून हा व्हिडीओ पाहून अनेकांनी नव्या नवेली नंदा हिचे काैतुक केले.