मुंबई : अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अगस्त्य नंदा याचा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश हे मिळाले नाही. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, बोनी कपूर यांची लेक खुशी कपूर आणि शाहरूख खानची लेक सुहाना खान यांनी एकाच चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. अगस्त्य नंदा याने बाॅलिवूडमध्ये पर्दापण केल्यापासून तो त्याच्या पर्सनल लाईफमुळे चांगलाच चर्चेत आलाय. आता नुकताच अगस्त्य नंदा याने मोठा खुलासा केला.
अगस्त्य नंदा हा आजी जया बच्चन आणि आई श्वेता बच्चन यांच्यासोबत नुकताच बहीण नव्या नवेली नंदा हिच्या शोमध्ये पोहचला. यावेळी काही मोठे खुलासे करताना अगस्त्य नंदा हा दिसला. हेच नाही तर थेट मेंटल हेल्थबद्दल बोलताना देखील अगस्त्य नंदा हा दिसला. आयुष्यात किती जास्त वाईट स्थितीतून आपण गेलो हे सांगताना देखील अगस्त्य नंदा हा दिसला.
अगस्त्य नंदा म्हणाला की, मी खूप जास्त गंभीर एंजायटीच्या काळातून गेलो आहे. मला यामधून निघण्यासाठी धर्म आणि आध्यात्मने मदत केली. हेच नाही तर अगस्त्य नंदा हा म्हणाला की, मी आयुष्यात खूप जास्त वाईट काळातून गेलो आहे. मेडिटेशनमुळे त्याला खूप जास्त मदत ही नक्कीच मिळाली आहे. मेडिटेशनमुळे बऱ्याच गोष्टींमध्ये बदल झाल्याचे त्याने म्हटले.
पुढे अगस्त्य नंदा म्हणाला, आपण एका अशा जगात जगतो जिथे सर्वकाही सुरू आहे. त्यावेळी तुम्ही अशी एखादी गोष्ट करता जी जमिनीसोबत जोडली गेलेली आहे. आपल्याला एक सवय आहे की, आपल्याला प्रत्येक गोष्ट एकदम झटक्यात मिळाली पाहिजे. आपण धैर्य आणि विश्वास दोन्ही गोष्टी सोडून दिल्या आहेत. मला माहितीये की, तुम्ही लोक हे माझ्यावर हासत आहेत.
मी एक धार्मिक आणि आधात्मिक आहे आणि हे सर्व माझ्यासोबत आपोआप होत गेले. यामुळे एखाद्या गोष्टीवर विश्वास करायला मिळतो आणि तुम्ही कंट्रोलच्या बाहेर होतात. आता अगस्त्य नंदा याच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. अगस्त्य नंदा हा अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता नंदा हिचा मुलगा आहे. अगस्त्य नंदा हा कायमच चर्चेत असणारे एका नाव आहे.