अभिनेता सैफ अली खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सैफ याने फार कमी वयात अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत लग्न केलं. दोघांमध्ये 12 वर्षांचं अंतर आहे. सैफ आणि अमृता यांना दोन मुलं देखील आहेत. दोन मुलांच्या जन्मानंतर देखील अमृता – सैफ यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. अमृता हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सैफ याने अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत लग्न केलं. करीना – सैफ यांच्या लग्नात अमृता उपस्थिती नव्हती पण तिने मुलगी सारा आणि मुलगा इब्राहिम यांना तयार करुन पाठवलं होतं.
एका मुलाखतीत करीना कपूर म्हणाली होती, मी कधीच अमृता हिला भेटली नाही. पण सिनेमांमुळे मी तिला ओळखते. मी अमृताची मोठी चाहती आहे… असं देखील बेबो म्हणाली होती. 2008 मध्ये ‘जब वी मेट’ सिनेमाच्या सक्सेसनंतर जेव्हा करीना हिने सैफ याच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठी प्रतिक्रिया दिली होती.
‘मला लग्न करायचं आहे आणि मला मुलांना जन्म देखील द्यायचा आहे.. सैफसोबत असलेल्या नत्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. माझ्यासाठी वेळ प्रचंड महत्त्वाची आहे. मी कायम सैफ याच्यासोबत राहाणार आहे. मी सैफ याच्या पहिल्या पत्नीचा देखील आदर करते.’
‘सैफ विवाहित आणि दोन मुलांचा बाप आहे… याचा मी सन्मान करते. मी कधी अमृताला भेटली नाही. पण मी तिचा आदर करते. सैफच्या आयुष्यात अमृता हिचं स्थान कायम महत्त्वाचं असेल… कारण ती सैफची पहिली पत्नी आणि त्याच्या दोन मुलांची आई आहे…’
‘मी सैफला सांगितलं होतं की, अमृता हिला कायम सन्मान मिळायला हवा… माझ्या आई – वडिलांनी मला असंच सांगितलं आहे. ते फक्त एक लग्न होतं, जे फार काळ टिकू शकलं नाही…’ असं देखील करीना कपूर मुलाखतीत म्हणाली होती. सांगायचं झालं तर सावत्र मुलांसोबत देखील करीना हिचे चांगले संबंध आहेत.
अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत घटस्फोट झाल्याच्या अनेक वर्षांनंतर सैफने अभिनेत्री करीना हिच्यासोबत लग्न केलं. खास पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला. सैफ आणि करीना यांना दोन मुलं आहे. तैमूर अली खान आणि जेह अली खान अशी दोघांच्या मुलांची नावे आहेत. सोशल मीडियावर करीनाची दोन्ही मुलांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात.