सैफ नव्हे तर ‘या’ क्रिकेटरशी अमृताला करायचं होतं लग्न; एका अटीमुळे तुटलं नातं

| Updated on: Oct 17, 2023 | 7:32 PM

अभिनेत्री सारा अली खानची आई आणि सैफ अली खानची पूर्व पत्नी अमृता सिंह नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली. सैफच्या आधी तिला एका क्रिकेटरशी लग्न करायचं होतं. मात्र एका अटीमुळे त्या दोघांचं लग्न होऊ शकलं नव्हतं. क्रिकेटरने लग्नाआधी ठेवलेली अट अमृताला मान्य नव्हती.

सैफ नव्हे तर या क्रिकेटरशी अमृताला करायचं होतं लग्न; एका अटीमुळे तुटलं नातं
Amrita Singh and Saif Ali Khan
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंह तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिली. अमृताने तिच्या करिअरमध्ये बरेच हिट चित्रपट दिले आहेत. त्याचसोबत 12 वर्षांनी लहान सैफ अली खानसोबत लग्नामुळेही ती चर्चेचा विषय ठरली होती. मात्र लग्नाच्या 13 वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले. सैफ आणि अमृता यांना दोन मुलं आहेत. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. फार कमी लोकांना ही गोष्ट माहीत असेल की लग्नासाठी अमृताची पहिली पसंत सैफ नाही तर दुसरीच व्यक्ती होती. ही व्यक्ती एक क्रिकेटर होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमृता सिंहचं लग्न आधी क्रिकेटर रवी शास्त्री यांच्यासोबत होणार होती. सैफच्या आधी तिचं नाव रवी शास्त्रीसोबत जोडलं गेलं होतं. हे दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते असंही म्हटलं जातं. इतकंच नव्हे तर दोघांचं लग्नसुद्धा ठरलं होतं. मात्र रवी शास्त्री यांच्या एका अटीमुळे या दोघांचं नातं कायमचं तुटलं.

हे सुद्धा वाचा

रवी शास्त्री यांनी लग्नासाठी अमृता सिंह यांच्यासमोर एक अट ठेवली होती. लग्नानंतर त्यांना फिल्म इंडस्ट्री सोडावी लागेल, अशी ही अट होती. मात्र ही अट अमृता यांना स्वीकार नव्हती. त्यावेळी ती बॉलिवूडमध्ये करिअरच्या शिखरावर होती. अभिनय करणं हे तिला सर्वाधिक पसंत होतं. म्हणूनच अमृताने रवी शास्त्री यांच्याशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि दोघांचे मार्ग कायमचे वेगळे झाले.

रवी शास्त्री यांच्याशी नातं तुटल्यानंतर अमृताची अभिनेते विनोद खन्ना यांच्याशी जवळीक वाढली होती. विनोद खन्ना आणि अमृताने ‘बंटवारा’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांजवळ आले होते. मात्र या दोघांचं लग्न होऊ शकलं नव्हतं. कारण विनोद त्यावेळी विवाहित होते. कोणत्याही विवाहित पुरुषाशी लग्न करण्याला अमृताच्या आईचा स्पष्ट विरोध होता.

रवी शास्त्री आणि विनोद खन्ना यांच्यानंतर अमृता सैफ अली खानला डेट करू लागली होती. डेटिंगनंतर या दोघांनी लग्न केलं. अमृता आणि सैफ यांचं लग्न हा बॉलिवूड इंडस्ट्रीत त्यावेळी मोठा चर्चेचा विषय होता. कारण सैफ तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळी अमृता टॉप अभिनेत्री होती आणि सैफने चित्रपटात पदार्पणसुद्धा केलं नव्हतं.