‘सैफ – करीना यांच्या नात्यामुळे…’, अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीचं मोठं वक्तव्य

| Updated on: Jun 02, 2024 | 12:02 PM

Saif Ali Khan - Kareena Kapoor Khan : एकमेकींचं तोंड देखील पाहात नाहीत अमृता सिंग - करीन कपूर, सैफ - करीना यांच्या नात्याबद्दल अमृता सिंग हिचं मोठं वक्तव्य..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सैफ - करीना यांच्या नात्याची चर्चा...

सैफ - करीना यांच्या नात्यामुळे..., अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीचं मोठं वक्तव्य
करीना कपूर - सैफ अली खान
Follow us on

अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांच्या नात्याबद्दल आज प्रत्येकाला माहिती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अमृता आणि सैफ एकमेकांपासून विभक्त राहातात. अमृता हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सैफ याने अभिनेत्री करीना हिच्यासोबत लग्न केलं. पतीच्या दुसऱ्या लग्नात स्वतः अमृता हिने मुलगी सारा आणि मुलगा इब्राहिम यांना तयार करुन पाठवलं होतं. पण घटस्फोटानंतर अमृता हिने सैफ आणि त्याच्या कुटुंबियांची कोणतेही संबंध ठेवले नाहीत.

घटस्फोटानंतर करीना – अमृता एकमेकींच्या संपर्कात नसल्या तरी, सारा आणि इब्राहिम यांच्यासोबत करीना हिचे चांगले संबंध आहेत. सर्व जण अनेकदा एकत्र फिरायला देखील जात असतात. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

एका मुलाखतीत अमृता हिने मोठं वक्तव्य केलं होतं. ‘मला करीनापासून काहीही अडचण नाही, शिवाय सारा हिचं करीनासोबत असलेल्या नात्याची देखील मला अडचण नाही. सैफ – करीना यांच्या लग्नात मी स्वतः सारा हिला तयार केलं होते. दोघांच्या नात्यामुळे देखील मला कधी काही वाटलं नाही…’

हे सुद्धा वाचा

दरम्यान, पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर सैफ याने 2012 मध्ये करीना हिच्यासोबत लग्न केलं. एका कार्यक्रमात, ‘करीना माझ्या आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट आहे…’ असं देखील सैफ म्हणाला होता. आज अभिनेता दुसऱ्या कुटुंबासोबत आनंदी आहे.

सैफ – करीना यांनी लग्न केल्यानंतर दोघांना देखील टीकेचा सामना करावा लागला. शिवाय अनेकांनी करीना हिला सैफ याच्यासोबत लग्न करू नकोस असा सल्ला दिला. पण सैफ – करीना यांनी सर्वांकडे दुर्लक्ष करत फक्त स्वतःच्या भावनांना अधिक महत्त्व दिलं.

सैफ आणि करीना यांना दोन मुलं आहे. तैमूर अली खान आणि जेह अली खान अशी दोघांच्या मुलांची नावे आहेत. सोशल मीडियावर करीनाची दोन्ही मुलांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. खुद्द करीना देखील सोशल मीडियावर मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

करीना हिची सावत्र मुलगी सारा हिच्याबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्रीने फार कमी काळात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. सारा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.