पैठणी साडी, केसात गजरा; अंबानींच्या कार्यक्रमात लेकीसह पोहोचल्या अमृता फडणवीस

| Updated on: Jul 15, 2024 | 9:26 AM

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या 'शुभ आशीर्वाद' कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता आणि कन्या दिविजा उपस्थित होत्या. पैठणी साडी, केसात गजरा.. असा अमृता यांचा पारंपरिक अंदाज पहायला मिळाला.

पैठणी साडी, केसात गजरा; अंबानींच्या कार्यक्रमात लेकीसह पोहोचल्या अमृता फडणवीस
अमृता फडणवीस आणि त्यांची मुलगी दिविजा फडणवीस
Image Credit source: Instagram
Follow us on

भव्य प्री-वेडिंगच्या जल्लोषानंतर मुकेश आणि नीता अंबानी यांचे चिरंजीव अनंत आणि मोठे व्यावसायिक वीरेन आणि शैला मर्चंट यांची कन्या राधिका यांनी शुक्रवारी रात्री मुंबईत लग्नगाठ बांधली. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) ‘जिओ वर्ल्ड ड्राइव्ह’ इथं पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला चित्रपट, राजकीय, क्रीडा तसंच इतर क्षेत्रातील असंख्य मान्यवरांची उपस्थिती पहायला मिळाली. शुक्रवारी पार पडलेल्या लग्नानंतर शनिवारी ‘शुभ आशीर्वाद’चा कार्यक्रम अंबानींकडून आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमालाही विविध सेलिब्रिटी उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिविजासुद्धा ‘शुभ आशीर्वाद’ कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात अमृता यांनी पिवळ्या रंगाची पैठणी साडी परिधान केली होती. पैठणी साडी, त्यावर भरजरी दागिने आणि केसात माळलेला गजरा असा त्यांचा पारंपरिक लूक पहायला मिळाला. तर मुलगी दिविजाने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. कार्यक्रमापूर्वी त्यांनी पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. त्याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

अमिताभ आणि जया बच्चन यांचे आशीर्वाद घेणारा शाहरुख खान, रजनीकांत, अनिल कपूर आणि रणवीर सिंह यांचा भन्नाट डान्स, तसंच किम आणि ख्लो कार्दशियन यांचा लक्षवेधी प्रवेश, ही अनंत आणि राधिका यांच्या विवाहसोहळ्यातील खास दृश्ये ठरली. ‘वेडिंग ऑफ द इयर’ म्हणून संबोधल्या गेलेल्या या लग्नसोहळ्याला देश विदेशातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. शनिवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दाम्पत्याला आशीर्वाद दिले.

अमिताभ आणि जया बच्चन, अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय, शाहरुख आणि गौरी खान, तमिळ सुपरस्टार रजनीकांत, हॉलिवूड अभिनेता आणि डब्ल्युडब्ल्युई फेम जॉन सीना, सलमान खान, संजय दत्त, अर्जुन कपूर, माधुरी दीक्षित, रणबीर कपूर-आलिया भट्ट, विकी कौशल-कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा-निक जोनास, सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंह धोनी, बाबा रामदेव, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी यांसह इतर अनेक मान्यवर या लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते.