कंगणावर हल्ला करणाऱ्या महिला जवानांबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

| Updated on: Jul 03, 2024 | 3:34 PM

कंगना रनौैतवर काही दिवसांपूर्वी एका महिला सीआयएसएफ महिला जवानाने हल्ला केला होता. शेतकरी आंदोलनावेळी कंगनाने केलेल्या टीकेमुळे ती नाराजी होती. महिला जवानाच्या या कृतीमुळे तिला निलंबित करण्यात आले होते. पण आता तिच्याबाबत आणखी एक नवीन अपडेट समोर आली आहे.

कंगणावर हल्ला करणाऱ्या महिला जवानांबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर
Follow us on

बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशातून भाजप खासदार कंगना रणौतला कानशिलात लगवणाऱ्या CISF महिला कर्मचारी कुलविंदर कौरला पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. आता कुलविंदरची बदली करण्यात आली आहे. चंदिगडमधून आता तिला बंगळुरूमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे.कुलविंदर कौरने चंदीगड विमानतळावर कंगनावर हात उचलला होता. कंगनाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत केलेल्या भूतकाळातील वक्तव्यामुळे ती नाराज होती. कंगनावर हल्ला केल्यामुळे कुलविंदरला नोकरीवरून निलंबित करण्यात आले होते.

घटनेनंतर बॉलिवूडमध्ये दोन गट

कंगनावर हात उचलणाऱ्या कुलविंदरला या घटनेनंतर अनेक शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला होता. तिचे संपूर्ण कुटुंब आणि गावकरीही कुलविंदरच्या समर्थनार्थ उतरले होते. पोलिसांनी कुलविंदरविरोधात एफआयआर नोंदवला होता. बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही लोकांनी कंगनावर केलेल्या हा हल्याचा निषेध केला होता. गायक विशाल ददलानीसह अनेकांनी सेलिब्रिटींनी कुलविंदरचे समर्थन केले होते. या घटनेनंतर सीआयएसएफ मध्ये असलेल्या कुलविंदरला जर पदावरून काढून टाकले तर तिला नोकरी देऊ, असे विशालने म्हटले होते.

कुलविंदरने माफी मागितले

सीआयएसएफचे अधिकारी विनय काजला यांनी कुलविंदरने माफी मागितल्याचे सांगितले होते. कुलविंदर आता माफी मागत असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय मी स्वतः कंगना राणौतची भेट घेतली आणि तिची माफी मागितली. कंगनाने कुलविंदर आणि तिच्या कुटुंबाबद्दलही विचारणा केली होती. ते कोण आहे आणि कुटुंबाची पार्श्वभूमी काय आहे.

कंगनाने काय म्हटले होते

घटनेनंतर कंगना राणौतनेही व्हिडिओ शेअर करत याबाबत प्रतिक्रिया दिली होती. तिने व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की, मला खूप फोन येत आहेत. सर्व प्रथम मी सुरक्षित आहे. चंदिगड विमानतळावर आज सुरक्षा तपासणीदरम्यान ही घटना घडली. सुरक्षा कर्मचारीने माझावर हल्ला केला. मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मी कारण विचारले असता तिने शेतकरी आंदोलन सांगितले आणि त्याला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. पंजाबमधील वाढता दहशतवाद आणि अतिरेकी आपण कसे हाताळणार ही माझी चिंता आहे. असं देखील तिने म्हटलं होतं.