मुंबई : शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये सुरूवातीपासूनच मोठी क्रेझ ही बघायला मिळत होती. शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नक्कीच ठरला. शेवटी मोठ्या प्रतिक्षेनंतर शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट (Movie) काल रिलीज झाला. शाहरुख खान याचा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. शाहरुख खान याच्या चित्रपटाने ओपनिंग डेलाच जबरदस्त अशी कामगिरी ही नक्कीच केलीये.
विशेष म्हणजे शाहरुख खान हा जवान चित्रपटाचे प्रमोशन सोशल मीडियाच्या माध्यमातून करत होता. फक्त भारतामध्येच नाही तर विदेशातही शाहरुख खान हा जवान चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी पोहचला होता. शाहरुख खान याने दुबईमध्ये जवान चित्रपटाचे प्रमोशन केले. शाहरुख खान याचे चाहते विदेशातही मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात.
काही वेळापूर्वीच बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुख खान याच्या चित्रपटाचे काैतुक केले. फक्त काैतुकच नाही तर थेट शाहरुख खान याला चित्रपटाचा देव कंगना राणावत हिने म्हटले. आता नुकताच आनंद महिंद्रा यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शाहरुख खान याची स्तुती केलीये.
All countries guard their natural mineral resources and mine them and usually export them to earn forex. Maybe it’s time to declare @iamsrk a Natural Resource… 🤔 😊 pic.twitter.com/RvXnegLga0
— anand mahindra (@anandmahindra) September 8, 2023
आनंद महिंद्रा यांनी शाहरुख खान याचा दुबईमधील व्हिडीओ शेअर करत थेट मोठी मागणीच करून टाकली आहे. आनंद महिंद्रा यांनी म्हटले की, सर्व देश त्यांच्या स्त्रोतांचे संरक्षण करतात. आता शाहरुख खान याला नैसर्गिक संसाधन म्हणून घोषित करण्याची वेळ आली आहे, असे थेट आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
आता आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. आनंद महिंद्रा यांची मागणी योग्यच असल्याचे देखील अनेकांनी म्हटले. शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट पुढील काही दिवसांमध्ये मोठा धमाका करण्याची दाट शक्यता आहे.