‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’मध्ये हा कलाकार कृष्णशास्त्री पंडित यांच्या भूमिकेत

| Updated on: Oct 23, 2024 | 2:03 PM

'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' हा चित्रपट दोन भागात मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यातील पहिला भाग येत्या 22 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराजमध्ये हा कलाकार कृष्णशास्त्री पंडित यांच्या भूमिकेत
Anand Pimpalkar
Follow us on

सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ, ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यांनी आजवर वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन केलं आहे. आता ते एका नव्या भूमिकेसह प्रेक्षकांच्या मनोरंजासाठी सज्ज झाले आहेत. ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या आगामी मराठी चित्रपटात एक महत्त्वपूर्ण भूमिका ते साकारणार आहेत. धर्मरक्षणासाठी ज्यांनी आपली आहुती दिली त्या अनेक अनामिक व्यक्तींपैकी एक जंजिऱ्याचे हनुमान भक्त आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पाईक कृष्णशास्त्री पंडित. या कृष्णशास्त्री पंडिताच्या दमदार भूमिकेमध्ये आपल्याला आनंद पिंपळकर दिसणार आहेत. यात अमृता खानविलकर आणि ठाकूर अनुप सिंग यांच्या समवेत अभिनयाची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे.

आपल्या भूमिकेविषयी बोलताना आनंद पिंपळकर म्हणाले, “आजवर बऱ्याच भूमिका साकारण्याचं भाग्य मला लाभलं. ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटातील कृष्णशास्त्री पंडित ही भूमिका माझ्यासाठी विशेष आहे. पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्याच्या विस्तार आणि बचाव करणाऱ्या या पराक्रमी राजाचा जीवनपट उलगडणाऱ्या ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटातल्या एका महत्त्वपूर्ण भूमिकेचा भाग होता आल्याचं खूप समाधान आहे. वेगळेपण आणि विशेष लकबी आत्मसात करून ही भूमिका मी साकारली आहे, प्रेक्षकांना ती नक्की आवडेल अशी आशा आहे.”

पहा टीझर

हे सुद्धा वाचा

आजवर प्रेक्षकांनी ऐतिहासिक चित्रपटांमध्ये अनेक मैदानी युद्धे बघितली आहेत. पण ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटात मैदानी युद्धासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने त्यांनी उभारलेल्या आरमाराचे समुद्रातील युद्ध भव्य स्वरूपात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता ठाकूर अनुप सिंग छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारणार असून छत्रपती संभाजी महाराजांच्या अर्धांगिनी ‘महाराणी येसूबाई भोसले’ यांची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर साकारणार आहे. अभिनेत्री किशोरी शहाणे या राजमाता जिजाऊ, भार्गवी चिरमुले ही धाराऊ माता, पल्लवी वैद्य ही सईबाई भोसले, कृतिका तुळसकर ही महाराणी सोयराबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.