देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांचा 12 जुलैला राधिक मर्चेंट बरोबर विवाह संपन्न होणार आहे. लग्नाचे सर्व विधी मुंबईच्या जियो वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहेत. या ग्रँड वेडींगमध्ये देश-विदेशातून अनेक VVIP पाहुणे आणि सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. सुरक्षेची काय व्यवस्था असणार? लग्नात जेवणाचा मेन्यू काय असणार? पाहुण्यांना अंबानी कुटुंब काय रिर्टन गिफ्ट देणार? या बद्दल जाणून घ्या. अनंत अंबानींच्या लग्नाच्यावेळी एकदम चोख सुरक्षा व्यवस्था असणार आहे. अंबानी कुटुंबातील सर्व सदस्यांना लग्नाच्यावेळी Z प्लस सिक्योरिटी असेल. इवेंटच्यावेळी इंटीग्रेटेड सिक्योरिटी ऑपरेशन सिस्टमचा (ISOS) सेटअप करण्यात येईल. ISOS सेंटरमधून इवेंटच्या सिक्योरिटी ऑपरेशन वर लक्ष ठेवण्यात येईल.
60 लोकांच्या सिक्योरिटी टीममध्ये 10 NSG कमांडोज आणि पोलीस अधिकारी असतील. 200 आंतरराष्ट्रीय सिक्योरिटी गार्ड्स तैनात असतील. 300 सिक्योरिटी मेंबर असतील. 100 पेक्षा जास्त ट्रॅफीक पोलीस आणि मुंबई पोलिसांचे जवान BKC मध्ये तैनात असतील.
जेवणामध्ये काय स्पेशल?
लग्नासाठी 10 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय शेफना बोलवण्यात आलं आहे. इंडोनेशियाची कोकोनट कॅटरिंग कंपनी 100 पेक्षा जास्त नारळी पदार्थांच्या डिश बनवणार आहे. 2500 पेक्षा जास्त डिश मेन्यू लिस्टमध्ये आहेत. काशीचा चाट आणि मद्रास कॅफेची फिल्टर कॉफी सुद्धा यामध्ये आहे. इटालियन आणि यूरोपियन स्टाइल फूड सुद्धा असेल. इंदूरच गराडू चाट, मुंगलेट आणि केसर क्रीम वडा सुद्धा मेन्यूमध्ये असेल. देशाच्या वेगवेगळ्या भागातून स्पेशल फूड स्टॉल लावण्यात येतील.
इतकं महागड रिटर्न गिफ्ट
लग्नाला येणारे सेलिब्रिटी आणि VVIP गेस्ट्सना रिटर्न गिफ्टमध्ये कोट्यवधी रुपयांच घड्याळ देण्यात येणार आहे. अन्य पाहुण्यांसाठी काश्मीर, राजकोट आणि वाराणसीतून स्पेशल गिफ्ट मागवण्यात आले आहेत. बांधनीची ओढणी आणि साडी बनवणाऱ्या विमल मजीठिया यांना 4 महीने आधीच गिफ्ट्स तयार करण्याची ऑर्डर देण्यात आली होती. प्रत्येक ओढणीची बॉर्डर परस्परापेक्षा बिलकुल वेगळी आहे. विमल यांनी एकूण 876 ओढण्या आणि साड्या तयार करुन पाठवल्या आहेत.
प्री-वेडिंग इवेंटमध्ये काय गिफ्ट होतं?
बनारसी फॅब्रिकची बॅग आणि रियल जरी पासून बनलेली जंगला ट्रेंडची साडी सुद्धा रिटर्न गिफ्टमध्ये देण्यात येईल. करीमनगरच्या कारीगरांनी बनवलेली चांदीच्या कलाकृती सुद्धा पाहुण्यांना भेट म्हणून देण्यात येईल. अनंत-राधिकाच्या पहिल्या प्री-वेडिंग इवेंटमध्ये पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट्समध्ये लुई विटॉनची बॅग, गोल्ड चेन, स्पेशल कँडल्स आणि डिजायनर फुटवेयर देण्यात आले.