मागच्याच आठवड्यात अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा भव्य विवाह सोहळा पार पडला. मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स येथे जियो वर्ल्ड सेंटरमध्ये चार दिवस हा लग्न सोहळा सुरु होता. संपूर्ण जगभरातून चौदा हजार लोक या लग्नाला उपस्थित होते. पाच महिन्याच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशननंतर अखेर हे लग्न झालं. या जोडप्याला त्यांचे आई-वडील आणि लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी खास गिफ्ट दिलेत. ऐकणारे थक्क होतील, आयुष्यभर लक्षात राहतील अशी गिफ्ट या पाहुण्यांनी अनंत-राधिकाला दिले. जॅकी श्रॉफने या जोडप्याला गिफ्टमध्ये रोपटं दिल्याची माहिती आहे.
अनंत आणि राधिका यांना त्यांचे पालक मुकेश आणि नीता अंबानी यांनी काही महागडी गिफ्टस दिली आहेत. यात आलिशान मॅन्शन सुद्धा आहे. मुकेश अंबानी यांनी अनंत-राधिकाला दुबईच्या पाम जुमैरा येथे 3000 चौरस फुटाच भव्य मॅन्शन गिफ्टमध्ये दिलय. यामध्ये दहा बेड रुम्स आणि खासगी मालकीचा बीच आहे. जवळपास 640 कोटी रुपये या मॅन्शनची किंमत आहे.
मोती आणि हिऱ्याची किंमत वाचून डोळे विस्फारतील
त्याशिवाय अनंत-राधिकाला महागडी बेन्टली GTC स्पीड कार गिफ्टमध्ये मिळालीय. याची किंमत 5.42 कोटी रुपये आहे. राधिकाला कस्टम मेड ज्वेलरी, 21.7 कोटी रुपयाचं कार्टियर ब्रोच भेट म्हणून मिळालय. अनंत-राधिकाला मुकेश आणि नीता अंबानी यांच्याकडून 108 कोटी रुपये किंमत असलेला मोती आणि हिरा गिफ्टमध्ये मिळालाय. डीएनएने हे वृत्त दिलय.
डोळे दिपवून टाकणारं सर्व काही या लग्नामध्ये
अनंत अंबानी यांचा लग्न सोहळा थक्क करुन सोडणारा होता. बॉलिवूड, क्रीडा, उद्योग सर्व क्षेत्रातील दिग्गज, सेलिब्रिटी या लग्न सोहळ्याला उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील दिग्गज उद्योगपती, देशो-देशीचे आंतरराष्ट्रीय नेते यांनी या विवाहसोहळ्याची शान वाढवली. पुढची काही वर्ष हा लग्न सोहळा सर्वांच्याच लक्षात राहील. कारण भव्य-दिव्य, डोळे दिपवून टाकणारं सर्व काही या लग्नामध्ये होतं.