Anant Radhika Wedding Reception: रिलायन्स समूहाचे चेअरमन आणि देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह १२ जुलै रोजी झाला. त्यानंतर १५ जुलैपर्यंत या लग्नसोहळ्याचे विविध कार्यक्रम होत आहे. त्यांच्या या लग्न सोहळ्यात जगभरातून दिग्गज आले आहे. त्यांनी वेगवेगळ्या भेटवस्तू या नवविवाहित जोडप्याला दिल्या. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भेटवस्तू दिली. ती भेटवस्तू अनंत अंबानी याने आपल्या डोक्याला लावली. त्यानंतर राधिकाला म्हटले, डोक्याला लाव.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जोडप्याचे लग्नासाठी अभिनंदन केले. यासोबतच पंतप्रधानांनी त्यांना एक खास भेट दिली. एका प्लेटमध्ये काही वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती प्लेट अनंत अंबानी यांना दिली. अनंत यांनी ती आपल्या कपाळावर लावली. त्यानंतर राधिकाला त्या भेटवस्तूला आपले डोके लावायला सांगितले. त्यानंतर अनंत अंबानी यांनी पंतप्रधान मोदी यांचे पाय चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले. राधिकानेही मोदी यांना नमस्कार केला. त्याचवेळी पीएम मोदी यांनी अनंत आणि राधिकाला आशीर्वाद दिले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी राधिका मर्चंटचे वडील वीरेन मर्चंट आणि आई शैला मर्चंट यांची भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी आलेले स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्याजवळ जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद देतांना आपल्या गळ्यातील रुद्राक्ष काढून त्यांच्या गळ्यात टाकले.
Grand Ambani wedding pm Modi sir is giving blessings #AmbaniFamilyWedding pic.twitter.com/qmt3bvi3JQ
— Dr Gautam Bhansali (@bhansaligautam1) July 13, 2024
लग्नसोहळ्याच्या रिशेप्शनमध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू उपमुख्यमंत्री पवन कल्याण, महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार यांच्यासह अनेक राजकीय दिग्गज आले होते. बॉलीवूडमधून अभिनेता अमिताभ बच्चन, शाहिद कपूर, माधुरी दीक्षित, अजय देवगन, संजय दत्त, शाहरुख खान, सलमान खान, रजनीकांत दिशा पाटनी, हेमा मालिनी, अनन्या पांडे यांच्यासह अनेक लोक आले होते.