Ananya Panday Affairs: अभिनेत्री अनन्या पांडे हिने फार कमी काळात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. पण अनन्या तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. छोट्या फिल्मी करियरमध्ये अनन्या हिने अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटींना डेट केलं आहे. आतापर्यंत अनन्या हिच्या नावाची चर्चा अनेक सेलिब्रिटी पुरुषांसोबत रंगली आहे.
अनन्या पांडे हिच्या बॉयफ्रेंडच्या लिस्टमध्ये सर्वात पहिलं नाव अभिनेता ईशान खट्टर याचं आहे. ईशान आणि अनन्या यांनी ‘खाली पीली’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर देखील दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
ईशान खट्टर याच्या नंतर अनन्या हिच्या नावाची चर्चा अभिनेता विजय देवककोंडा याच्यासोबत सुरु होती. दोघांनी ‘लायगर’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं. पण दोघांनी कधीच नात्यावर अधिकृत घोषणा केली नाही.
विजय देवरकोंडा याच्यानंतर अनन्या आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर यांच्या नात्याची चर्चा तुफान रंगली. दोघे एकदा परदेशात देखील फिरायला गेले होते. परदेशातील दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. एवढंच नाही तर, दोघांनी डिनर डेट दरम्यान देखील स्पॉट करण्यात आलं. पण गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या ब्रेकअप चर्चा सुरु आहे. पण यावर कोणीच अधिकृत घोषणा केलेली नाही.
अनन्या पांडे हिच्या करियरबद्दल सांगायचं झालं, दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘स्टूडेंट ऑफ द ईयर 2’ सिनेमातून अनन्या हिने करियरला सुरुवात केली. सिनेमात अभिनेत्री टायगर श्रॉफसोबत देखील दिसली.पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला.
‘स्टूडेंट ऑफ द ईयर 2’ सिनेमानंतर अनन्या पांडे ‘लायगर’, ‘पति पत्नी और वो’ आणि ‘ड्रीम गर्ल 2’ यांसरख्या सिनेमांध्ये देखील दिसली. सोशल मीडियावर देखील अनन्या कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.