मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अनन्या पांडे हिचा काही दिवसांपूर्वीच लाईगर हा चित्रपट (Movie) रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. अनन्या पांडे ही लाईगर चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसली होती. या चित्रपटात साऊथ स्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) हा देखील मुख्य भूमिकेत होता. मात्र, लाईगर चित्रपट फ्लाॅप गेला. लाईगर चित्रपटाच्या अपयशाचे खापर शेवटी अनन्या पांडे हिच्यावरच फोडण्यात आले. लाईगर चित्रपटानंतर अनन्या पांडे आपल्या फिसमध्ये मोठी वाढ करणार होती.
लाईगर चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर अनन्या पांडे हिला अनेक चित्रपटांच्या आॅफर या सातत्याने येत होत्या. मात्र, जसाही लाईगर चित्रपट फ्लाॅप गेला आणि चित्रपट निर्मात्यांनी अनन्या पांडे हिच्याकडे पाठ फिरवली. लाईगर हा बिग बजेटचा चित्रपट होता. अनेकांनी लाईगर चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर अनन्या पांडे हिच्यावर टिका करण्यास सुरूवात केली.
गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहे की, अनन्या पांडे ही बाॅलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर याला डेट करत आहे. दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. बऱ्याच पार्ट्यांमध्ये आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे सोबत दाखल होतात. इतकेच नाही तर अनेकदा हे दोघे एकसोबत स्पाॅट झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अनन्या पांडे हिने आदित्य रॉय कपूर याच्यासोबत एक खास फोटोशूट देखील केले होते.
आदित्य रॉय कपूर याच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चा सुरू असतानाच नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अनन्या पांडे हिने आपल्या लग्नाचे प्लॅनिंग थेट सांगितले आहे. अनन्या पांडे म्हणाली की, मुळात म्हणजे माझे खूप कमी वय हे लग्न करण्यासाठी आहे. पुढे अनन्या म्हणाली की, मी अजून लग्नाचे काहीच प्लॅनिंग केले नाहीये. आता माझे वय हे लग्नासाठीचे योग्य वयच नाहीये.
अनन्या पांडे ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाचे दिल्लीमध्ये शूटिंग करत आहे. ड्रीमगर्ल 2 चित्रपटात अनन्या पांडे ही आयुष्मान खुराना याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अचानक ड्रीमगर्ल 2 चित्रपटात अनन्या पांडे ही महत्वाच्या भूमिकेत असल्याचे जाहिर केल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. नुसरतचा पत्ता अनन्या पांडे हिच्यासोबत चित्रपटातून कट झालाय. यावर काही दिवसांपूर्वी नुसरतने मोठे भाष्य केले होते.