‘मारुन टाकलं जाईल…’, सलमान खान नंतर, उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, सर्वत्र खळबळ

| Updated on: Dec 10, 2024 | 1:58 PM

बॉलिवूड सेलिब्रिटींनंतर राजकीय व्यक्तींना देखील जीवे मारण्याची धमकी, सलमान खान नंतर, उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, 'मारुन टाकलं जाईल...', पोलिसांकडून चौकशी सुरु...

मारुन टाकलं जाईल...,  सलमान खान नंतर, उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, सर्वत्र खळबळ
Follow us on

अभिनेता सलमान खान याच्यानंतर अनेक सेलिब्रिटींना जीवेमारण्याची धमकी देण्यात आली. आता दाक्षिणात्य विश्वातील प्रसिद्ध अभिनेते आणि आंद्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना देखील जीवेमारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकीकडे सलमान खान, शाहरुख खान यांसारख्या लोकप्रिय सेलिब्रिटींना जीवेमारण्याची धमकी मिळत आहे, तर दुसरीकडे राजकारत सक्रिय असणाऱ्या व्यक्तींना देखील जीवेमारण्याची धमकी मिळत आहे. दरम्यान, पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.

आता पवन कल्याण यांना देखील धमकीचा फोन आला आहे. जिथे दादागिरी करत शिवीगाळ करत उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सोमवारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य करणारा एक मेसेज आणि कॉल आला होता, जिथे अपशब्द वापरले आणि धमकीचा मेसेज देखील पाठवला. मिळालेल्या माहितीनुसार, धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.

पवन कल्याण यांना धमकी…

पवन कल्याण यांच्या जनसेवा पार्टीच्या ट्विटर हँडलवरूनही एक पोस्ट करण्यात आली. ‘मोबाईलवर धमकीचा कॉल आला. उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना एका अनोळखी क्रमांकावरून धमकीचा फोन आला की त्यांना मारून टाकलं जाईल. यानंतर शिवीगाळ करणारे अनेक मेसेजही आले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.

तपास सुरु

पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतल्यानंतर संबंधित प्रकरणी कसून चौकशी सुरु केली आहे. पण अद्याप कॉल आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. धमकी देण्यामागे नक्की कोणता हेतू असेल… याबाबत देखील काही कळू शकलेलं नाही. शिवाय पोलिसांनी देखील प्रकरणावर अद्याप मौन बाळगलं आहे.