मुंबई | 23 ऑक्टोबर 2023 : झगमगत्या विश्वातील एका प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या वडिलांचं निधन झालं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे अभिनेत्याच्या वडिलांनी एकेकाळी क्रिकेटचं मैदान गाजवलेलं होतं. आता त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये आणि क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे. अभिनेता अंगद बेदी याचे वडील आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांचं निधन झालं आहे. बिशन सिंह बेदी यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बिशन सिंह बेदी यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रीटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी श्रद्धांजवी वाहिली आहे.
अभिनेता संजय दत्त याने बिशन सिंह बेदी यांच्या निधनानंतर ट्विट करत दुःख व्यक्त केलं आहे. अभिनेता म्हणाला, ‘क्रिकेटने आज एक दिग्गज गमावला आहे. पण बिशन सिंह बेदी यांनी तयार केलेल्या आठवणी आणि क्षण कायम जिवंत राहतील… त्यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त करताना विचार त्यांच्या कुटुंबासह आणि संपूर्ण क्रिकेटविश्वासोबत आहेत… ‘ सध्या सर्वत्र अभिनेत्याची पोस्ट व्हायरल होत आहे.
Cricket has lost a legend today, but the memories and moments created by Bishan Singh Bedi ji will live on forever. My thoughts are with his family and the entire cricketing community as we mourn this profound loss.
— Sanjay Dutt (@duttsanjay) October 23, 2023
बिशन सिंह बेदी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, बिशन सिंह बेदी हे त्यांच्या काळातले दिग्गज स्पिनरपैकी एक होते. बिशन सिंह बेदी यांनी टीम इंडियाचं नेतृत्वही केलं होतं. बिशन सिंह बेदी यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी बिशन सिंह बेदी यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रत्येक जण बिशन सिंह बेदी यांच्याबाबतच्या क्रिकेटच्या आठवणींना उजाळा देत आहे. त्यांच्या निधनानंतर क्रिकेटविश्वाचं मोठं नुकसान झालं आहे. असं म्हणायला हरकत नाही.
बिशन सिंह बेदी यांनी आपल्या स्पिनच्या जोरावर टीम इंडियासाठी 67 टेस्ट मॅचमध्ये 266 विकेट्स आपल्या नावावर केल्या. मात्र बेदींची वनडे कारकीर्द हे कसोटीच्या तुलनेत फारशी मोठी ठरली नाही. बेदी यांनी 10 वनडे मॅचेसमध्ये 7 विकेट्स आपल्या नावावर केल्या. यांसारखे अनेक रेकॉर्ड बिशन सिंह बेदी यांनी आपल्या नावावर केले होते.