मुंबई | 15 मार्च 2024 : महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर शुक्रवारी सकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कोकिलाबेन रुग्णालयात अमिताभ यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आहे. सकाळी 6 वाजता बिग बींनी कडक सुरक्षेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बिग बींवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.अमिताभ बच्चन यांच्या शस्त्रक्रियेची माहिती मिळाल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.
वयाच्या 81 व्या बिग बी यांच्या शस्त्रक्रिया झाल्यामुळे चाहते चिंतेत आहेत. पण त्यांच्यावर करण्यात आलेली अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली आहे. हार्ट ब्लॉकेजनंतर अमिताभ बच्चन यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत आता प्रकृती स्थिर असल्याची माहिती चाहत्यांनी दिली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे. बिग बी ट्विट करत म्हणाले, ‘कायम कृतज्ञ…’ बिग बींच्या ट्विटवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत प्रेम व्यक्त करत आहेत.
T 4950 – in gratitude ever ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 15, 2024
शस्त्रक्रियेनंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं आहे. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांचे आभार व्यक्त केलं आहे. बिग बींची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे. आमिताभ बच्चन यांच्या ट्विटवर कमेंट करत चाहते त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करताना दिसत आहेत.
सांगायचं झाल तर, अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. बिगी बी त्यांच्या आयुष्यातील चांगल्या वाईट घटना सोशल मीडिया आणि ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. बिग बी कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफशेनल आयुष्यामुळे चर्चेत असतात.
KBC 14 च्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांच्या पायाची नसा कापली गेली होती. बिग दोनवेळा कोरोनाच्या विळख्यात अडकले होती. काही दिसांपूर्वी सिनेमाच्या शुटिंग दरम्यान देखील अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती. ज्यामुळे त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. तेव्हा देखील बिग बी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःच्या प्रकृतीची माहिती चाहत्यांनी कळवत होते.