Malaika Arora Father Death: अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मलायका हिच्या वडिलांनी स्वतःचं आयुष्य संपवल्यामुळे बॉलिवूडमध्ये एक खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलीस सध्या कसून चौकशी करत आहे. सांगायचं झालं तर, मलायका हिच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी समोर आली तेव्हा त्याचं नाव अनिल अरोरा असल्याचं समोर आलं. पण पोलिसांनी मलायकाच्या वडिलांचा अनिल मेहता म्हणून उल्लेख केला. त्यानंतर खुद्द मलायकाने देखील वडिलांच्या निधनानंतर एका पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये अभिनेत्री वडिलांचा उल्लेख अनिल मेहता असा केला…. त्यामुळे अनिल मेहता हे मलायकाचे सावत्र वडील होते का अशी चर्चा सध्या सुरु आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अनिल मेहता हे मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांचे खरे वडील नव्हते. अनिल मेहता हे मलायका अरोरा अणि तिच्या बहिणीचे सावत्र वडील होते. शिवाय दोघांच्या वयात देखील फार अंतर नसल्याची माहिती समोर येत आहे. मलायका आणि अनिल मेहता यांच्यामध्ये फक्त 11 वर्षांचं अंतर होतं. अमिल मेहता यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1962 मध्ये झाला होता, तर मलायकाचा जन्म 23 ऑक्टोबर 1973 मध्ये झाला. अशा प्रकारे दोघांच्या वयात फक्त 11 वर्षांचं अंतर होतं.
वडिलांच्या निधनानंतर भावूक पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, ‘तुम्हा सर्वांना सांगताना दुःख होत आहे की, एक मृदू आत्मा, एक अद्भुत आजोबा, एक प्रेमळ पती आणि सर्वांचे सर्वात चांगले मित्र असलेले आमचे वडील अनिल मेहता यांचं निधन झालं आहे. आमच्या कुटुंबाला सध्या मोठा धक्का बसला आहे. आम्ही सर्व मीडिया आणि शुभचिंतकांकडून गोपनीयतेची विनंती करतो. सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.’ सध्या अभिनेत्रीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका हिच्या वडिलांच्या मृत्यूची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीच्या वडिलांनी टोकाचं पाऊल का उचललं आणि इतर बाजूंची पोलीस कसून चौकशी करत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मलायकाचे मित्र, कुटुंबिय अभिनेत्रीच्या वडिलांच्या घरी पोहोचले.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर, अभिनेत्री करीना कपूर, अभिनेत्री करिश्मा कपूर, अभिनेता अरबाज खान, सलमान खान, सोहैल खान आणि संपूर्ण खान कुटुंब देखील मलायकाच्या घरी पोहोचलं. सध्या सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी देखील मलायकाच्या वडिलांना श्रद्धांजली वाहत आहेत.