Casting couch: ‘पोर्टफोलियो मागितला, रात्री घरी बोलावलं, त्यानंतर मात्र…’, ॲनिमल फेम अभिनेत्यावर आलेलं संकट

| Updated on: Jul 17, 2024 | 2:44 PM

Casting couch: कॉर्डिनेटरच्या घरात असं काय होतं, जे पाहिल्यानंतर अभिनेत्याला सुरक्षित वाटलं, पण त्यानंतर जे काही झालं, ते होतं भयानक...., कास्टिंग काऊचबद्दल अभिनेत्याने सोडलं मौन, फक्त अभिनेत्री नाही तर, अभिनेत्यांना देखील करावा लागतो कास्टिंग काऊचचा सामना....

Casting couch: पोर्टफोलियो मागितला, रात्री घरी बोलावलं, त्यानंतर मात्र..., ॲनिमल फेम अभिनेत्यावर आलेलं संकट
Follow us on

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ सिनेमात अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत होते. तर अभिनेता सिद्धांत कर्णिक याने सिनेमात रणबीर याच्या बहिणीच्या नवऱ्याची भूमिका साकारली होती. आता सिद्धांत याने मोठा खुलासा केला आहे. करियरच्या सुरुवातीला, कास्टिंग काऊचचा आलेले अनुभव अभिनेत्याने नुकताच झालेल्या मुलाखतीत सांगितला आहे. धक्कादायक घटना घडली तेव्हा अभिनेता फक्त 22 वर्षांचा होता. अनेक वर्षांनंतर अभिनेत्याने त्याच्यासोबत घडलेल्या कृत्याचा खुलासा केला.

वयाच्या 22 व्या वर्षी घडलेली घटना अभिनेत्याने 41 व्या वर्षी सांगितली. ‘2005 मध्ये मी फक्त 22 वर्षांचा होतो. नवीनच इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली होती. तेव्हा माझी ओळख एका कॉर्डिनेटरसोबत झाली. त्याने माझा पोर्टफोलियो मागितला. त्यानंतर रात्री 10 च्या सुमारास त्याने मला भेटायला बोलावलं… मला विचित्र वाटलं पण मी त्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला…’

‘मी याबद्दल मी फार विचार केला नाही. मी त्याच्या घरी गेलो. त्यांच्या घरात सर्वत्र कुटुंबाचे फोटो लावले होते. त्यामुळे मला सुरक्षित वाटलं. पण त्यानंतर तो माणूस माझ्या जवळ येऊ लागला. मी त्याला नकार दिला तर तो संतापला आणि म्हणाला इंडस्ट्रीमध्ये कम्प्रोमाइज करावाच लागतो. त्याने मला धमकी दिला, कोण तुला काम देतं, हेच मी पाहातो…’

पुढे सिद्धांत म्हणाला, ‘तेव्हा इंडस्ट्रीमध्ये माझी ओळख नव्हती. शिवाय मला देखील कोणी ओळखत नव्हतं. माझा कोणी गॉडफादर नव्हता. पण मी कोणाला घाबरलो नाही… मी संघर्ष केला आणि माझे स्वप्न पूर्ण केले…. त्यानंतर एका कॉलेजच्या कार्यक्रमात आमची भेट झाली. तेव्हा मला कळलं ही लोकं बलात्कारी नाहीत. फक्त संधी शोधत असतात. पण कोणत्या संधीसाठी स्वतःला बदलण्याची काहीही गरज नाही…’ असं देखील अभिनेता म्हणाला.

सिद्धांत याच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘ॲनिमल’ सिनेमामुळे अभिनेत्याच्या लोकप्रियतेत वाढ झाला. ‘ॲनिमल’ सिनेमा शिवाय सिद्धांत याने ‘थप्पड’ आणि ‘लफंगे परिंदे’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिद्धांत कर्णिक याची चर्चा रंगली आहे.