सलमानच्या पाया पडताना अनिरुद्धाचार्यांचा फेक फोटो व्हायरल, पोलिसांकडून मोठी कारवाई

| Updated on: Oct 15, 2024 | 3:03 PM

Bigg Boss 18: नाही म्हणून 'बिग बॉस 18' मध्ये पोहोचलं कथाकार अनिरुद्धाचार्य, सलमानच्या पाया पडतानाचा फेक फोटो व्हायरल होतात सर्वत्र खळबळ... पोलिसांनी घेतला मोठा निर्णय..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कथाकार अनिरुद्धाचार्य यांची चर्चा

सलमानच्या पाया पडताना अनिरुद्धाचार्यांचा फेक फोटो व्हायरल, पोलिसांकडून मोठी कारवाई
Follow us on

Bigg Boss 18: अभिनेता सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून ‘बिग बॉस’च्या होस्टची जबाबदारी पार पाडत आहे. बिग बॉसच्या प्रत्येक सिझनमध्ये काही वाद झाले आणि सर्वत्र चर्चा रंगली आहे. आता कथाकार अनिरुद्धाचार्य ‘बिग बॉस’ शोमुळे चर्चेत आले आहेत. शोमध्ये कथाकार अनिरुद्धाचार्य पाहुणे म्हणून पोहोचले होते. पण ते शोमध्ये आल्यामुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. कथाकार अनिरुद्धाचार्य यांनी ‘बिग बॉस’ शोमध्ये गेलेलं अनेकांना आवडलं नाही. ज्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं.

दरम्यान, कथाकार अनिरुद्धाचार्य यांचा एक फेक फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. फोटोमध्ये कथाकार अनिरुद्धाचार्य हे अभिनेता सलमान खान याच्या पाया पडकाना दिसले. फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अनिरुद्धाचार्य यांनी संताप व्यक्त केला. अनिरुद्धाचार्य यांच्या भक्तांमध्ये देखील वादग्रस्त वातावरण निर्माण झालं. पण अनिरुद्धाचार्य यांचा फेक फोटो एडिट करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

 

खुद्द अनिरुद्धाचार्य यांनी यासंबंधी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. अनिरुद्धाचार्य यांनी फेक फोटो तयार करणाऱ्या आरोपीचा फोटो देखील समोर आणला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आरोपीचं नाव मोहम्मद आसिफ अली असून तो चिल्हारी गावचा नागरिक आहे.

मोहम्मद आसिफ अली याचा पोस्ट करत अनिरुद्धाचार्य कॅप्शनमध्ये म्हणाले, ‘पूज्य महाराजांचा अपमान करण्याच्या उद्देशाने फोटोशी छेडछाड करून सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरवणाऱ्यांना धडा शिकवण्यात आला आहे. त्याबद्दल विश्व हिंदू परिषद आणि चाचई पोलीस स्टेशनच्या अधीक्षकांचे खूप आभार.’ त्यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कथावाचक अनिरुद्धाचार्य यांनी मागितली भक्तांची माफी

‘बिग बॉस 18’ शोमध्ये जाण्यावरून अनिरुद्धाचार्य यांनी भक्तांची माफी मागितली होती. माफी मागताना त्यांनी एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यांच्या व्हिडीओची देखील तुफान चर्चा रंगली.

या व्हिडिओमध्ये अनिरुद्धाचार्य म्हणाले, ‘बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून जाणार नाही असं मी सांगितलं होतं आणि मी गेलो मी. बिग बॉसच्या घरात मी फक्त गीता आणि सनातन धर्माच्या प्रचारासाठी गेलो…’ असं देखील कथावाचक अनिरुद्धाचार्य म्हणाले होते.